Wednesday, August 28, 2019

एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार सामाजिक  कविता


माझ्या खिश्यात सरकार आहे
तरीही
माझा खिसा फाटलेला आहे
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )

राष्ट्रे रॅन्डमली निर्माण होतात
नाहीशी होतात

राष्ट्रे अमिबा आहेत

मी राष्ट्र आहे

श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )

तुझ्यात एव्हढी एनर्जी येते कुठून ?

सगळंच प्रचंड तुझं

तुझा सततचा प्रश्न

खरतरं मला आकाराची जाणीव द्यायला निसर्ग विसरलाय

मी फक्त ऍक्शन आहे

माझ्या स्वातंत्र्याचा शेवट कृतीतच होतो

अभंग आणि पक्षी माझ्यात सारख्याच तन्मयतेने उडतात

मंदिरातील घंटांना आभाळापर्यंत भिडवायला मला आवडतं

तू म्हणतीयेस

आपण सगळे मरणार आहोत मग हा खटाटोप कशासाठी

मी म्हणतोय

आपण सर्व जगत आहोत
ज्यांना जगणे जमत नाही
त्यांना मरणाची आठवण येते

आपण दोघेही वीज पडणाऱ्या झाडाखाली बसून आहोत





(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )
श्रीधर तिळवे नाईक
मी फक्त भारताचा नागरिक नाही 
मी जगाचा नागरिक आहे 

मी कवी आहे अख्ख्या ब्रह्मांडाचा 

मी शब्दब्रम्ह नाही 
मी शिव आहे 
जो शब्दांचा संहार करत 
अर्थ नाचवतो 

मी विष्णू नाही 
म्हणून विठ्ठलही नाही 
मला रुक्मिणीला 
अडवून ठेवलेलं आवडत नाही 

लक्ष्मी माझे पाय चेपत नाही 
कारण माझा पाया पार्वती आहे 
आणि तिची शक्ती चालवेल तसा मी भटकतो आहे 

मी निर्माण करतो नाचवतो 
मी नाचतो निर्माण होते 

लय हे केवळ मृत्यूचे नाव नाही 
ते मृत्यूचे सौंदर्य आहे 

मी अमेरिकेत बँकांपासून असलेली मुक्तता आहे 
रशियात साम्यवादाचे स्वातंत्र्य 

माझी रिझर्व्ह बँक 
मी अद्याप गहाण टाकलेली नाही 
किंवा बाटाच्या चप्पला घातल्या म्हणून 
माझी भटकंती मी कधी कुणाला उसणीही दिली नाही 

मी समाजवादाचा पाषाण नाही 
माझ्या काळजाचा दगड थेट शिल्प म्हणून जन्मलेला आहे 
आणि ज्याला तोल म्हणजे काय 
हे जन्मजात माहीत आहे 

मी मंदीतली संधी आहे 
भरभराटीतली लाट 

मी शेअर बाजारातले शेअर काढलेले नाहीत 
माझी कंपनी एकांत चालवते 

कार्पोरेटच्या रेटवर रॅटरेस चालवणाऱ्यांना 
मी वॉकिंग डिस्टन्सवर चालवतो 
आणि माझ्या सुवर्णमध्याला 
सुवर्णविनिमयाचा दर्जा देत 
मोक्ष साधण्याचा माझा मनसुबा 
रक्तात बसून योग्य जागी हलवतो 

कविंची ह्या बाजारात किंमत काय 
ह्या प्रश्नाचे 
मी उत्तर आहे 

श्रीधर तिळवे -नाईक 
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या काव्यफाइलीतून )
(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )

दृश्ये समुद्रात मरून पडलेत
कि समुद्र दृश्यात मरून पडलाय
सांगणे कठीण आहे

क्षितिज पुस्तकांच्या शेल्व्हसारखे दिसू लागलंय
जणू प्रत्येक सूर्योदय एका पुस्तकासारखा उगवतो
पुस्तकासारखा मावळतो

ह्या गोव्यात मी येत नाही
आलो तरी नातेवाईकांना भेटत नाही

आमच्या दरम्यान हा समुद्र

दरवाजा बंद केला कि तो खिडक्यांतून येतो
खिडक्या बंद केल्या कि छतातून

ह्या नात्यांचं नातेवाईकांचं काय करू ?

कोल्हापूर कधी कावळ्यासारखं कावकाव करतं
कधी कोकिळेसारखं कुहूकुहू

दोन भूप्रदेशात फसणाऱ्यांना
अनेकदा सर्व काही प्राणिसंग्रहालयासारखं दिसू लागतं

मी इथे मिरामारवर उभा आहे

समोर सर्वच पोपटी रंगाचे ड्रेस घालून
पोपटांनी कॉटेज इंडस्ट्री सुरु केली काय

कुणीतरी गाणं थांबवतो
आणि युद्ध सुरु होतं

माणसे वाढतात म्हणजे काय होते
स्वार्थ वाढतात कि माणसांची मॅच्युरिटी वाढते
कि मॅच्युरिटी वाढली कि
माणसांचे स्वार्थ वाढतात ?

माझी मातृमुखी इस्टेट हडपण्याचा प्रयत्न

मला गावात जावेसे वाटत नाही

आई विचारतीये बी ए नंतर काय ?
आणि मी प्रश्नापासून पळून
इथे समुद्रापुढे

कुंड्यात झाडे घेऊन दोघेजण चाललेत
झाडांनी माणसांना असं कुंड्यात न्हेऊन चालायला सुरवात केली तर

माणूस प्रत्येक गोष्टीचा
कुंड्या कुडा आणि कचरा करत चाललाय
आपणही तेच करणार

समुद्र ढग वजा करतोय
नद्या ऍड करतोय
ह्या बोटींना व माणसांना तो ऍड करत असेल का
कि वजा करण्याची वाट पहात असेल ?

तिचं प्रेम घोडागाडीत बसून येतं
आणि घोडयाला गाडीत टाकून निघून जातं

मी उभा आहे
कि समुद्र उभा आहे
आणि जमीनरूपी खांद्यावर मला खेळवतोय ?

श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )


चंद्राची सूर्याला उद्देशून स्वगते



मी काय आहे
एक मातीचा गोळा कि
हवाई चाळा

पृथ्वीपासून अलग झालोय
कि अलग केला गेलोय
कि मी पृथ्वीचा नाहीयेच मुळी
आणि पृथ्वीच्या तावडीत सापडलोय



माझ्यावर माणूस दाखल झाला तेव्हा वाटलं
कदाचित सगळं आता समजेल
समजेल कि आपण काय आहोत

आपणाला स्वतःच ज्ञान होत नाही
हे दुःख विसरून
मी वाट पहात होतो
माझ्या ओळखीची

आणि माणसांना भ्रांत माझ्या स्वरूपाची



माझ्याविषयीच्या दंतकथा पाहून
मीही कंटाळलोच होतो

बाई काय
मामा काय
आई काय

माणसांनी काय काय बनवलं मला

उल्लू बनवलं नाही
नशीब



ग्रहाच्या आणि माणसाच्या अस्तित्वाचे
फलित एकसारखेच कि भिन्न

म्हणजे समज मी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या साहाय्याने
पृथ्वीवर पूर आणले तर
माणूसजात संपूर्ण बुडेल ?

मला कधीच खात्री नाही वाटली माणसाच्या संपूर्ण बुडायची
उलट आता भीती कि क्षेपणास्त्रांनी मलाच उडवतील



तू प्रकाश पाठवतोस
आणि मी प्रकाशित होतो

माझ्याजवळ स्वयंभू प्रकाश नाही
ह्याचे सुरवातीला खूप दुःख वाटायचे

मग कळले
तू एखाद्या ईश्वरासारखा आहेस
आणि मी मोक्ष मिळालेल्या सिद्धासारखा

म्हणजे आत पौर्णिमा
पण सोर्स बाहेरचा

तू मला नियंत्रित करतोयस
कि तुझीही काही नियती ऑपरेट होतीये
जी तुला  तुझा प्रकाश
मला द्यायला भाग पाडतीये ?



तुझ्या आधी मी मरणार
हे तर उघडच आहे
पण मरताना हे दुःख राहीलच

मी तुझा प्रकाश पाहिला आणि वाहिला
पण तुला कधी नीट
संपूर्ण पाहू शकलो नाही

श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )


मार्क्सवाद्यांसाठी एक कविता 

स्वतःच्या आयडियालॉजीमधून जरा बाहेर पड 

फक्त तुझ्या प्रेषितालाच सत्य कळालं 
हा भ्रम काढून टाक 

माणूस अमर नसतो 
आणि त्याने निर्माण केलेला धर्म वा आयडियालॉजीही 

मेलेले सडत जाते 
आणि मेलेल्याच्या सहवासात राहणाऱ्यांना सडवत जाते 

स्वतःला प्रेताशी बांधून घेऊन डान्स करण्याची ही सवय 
सोडून दे 

प्रेताशी बांधून घेणारे स्वतःचा मर्डर करत असतात 
आणि त्यांचे सर्व डान्स अंतिमतः मर्डर डान्स असतात 

तेव्हा जगायचंय 
कि प्रेतात सडत श्वास मोजत फक्त टिकायचंय ?

प्रेतात एक सिक्युरिटी असते 
प्रेत प्रतिवाद करत नसते 

तुला प्रेतातून बाहेर पडण्याचे 
भय का ?

प्रेताभवती जमलेल्या गोतावळ्यावर जाऊ नकोस 

तोही तुझ्यासारखाच प्रेताचे व्यसन लागलेल्या माणसांचा 
समूह आहे 

हे डेथ ऍडिक्शन अफूइतकेच निरागस आणि भयावह आहे 

जिवंत जगण्यासाठी बाहेर पड 

नाहीतर मरेपर्यंत सिक्युअर मर  



श्रीधर तिळवे नाईक

(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )


श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )
श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )
श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )
श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )

श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )
श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )
श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )
श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरिजमधील एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून )

Thursday, April 18, 2019

सर्वांना स्वतःसारखं बनवण्याचा प्रोग्राम 

सगळेच एकमेकासारखे दिसायला लागले 
तर स्वतःला ओळखता येईल का 

नशीब समज 
हा प्रोग्राम फेल जातो 

नाहीतर खाणारा तू बनवणारा तू 
कचरा उचलणारा तू बायको तू मुलं तू 

सत्ता अंतिमतः बोअर करते 
सपाट करते 

म्हणूनच शेजारचा तुझ्यासारखा नाही 
म्हणून स्वतःला भाग्यवान समज 

जगाचे सौंदर्य 
आपण एकमेकासारखे नाही आहोत 
म्हणून टिकून आहे 
श्रीधर तिळवे नाईक 

 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून
--------------------------------------------------------------------
फक्त कविता लिहितांनाच कवी असण्याचा प्रयत्न केला 
पण आपल्या स्वभावाने तो हाणून पाडला 

आता स्वभाव बदलून देणाऱ्या दुकानाच्या शोधात निघालोय 
तर लोक म्हणतायत 
असं कधी कुठं दुकान असतं काय ?

त्यांना कसं सांगावं आपला हळवेपणा कसा मांजर बनून 
यशस्वीपणाच्या आड येतो 
किंवा लहरीपणा कसा समोरचा सोनं देत असतांना 
त्याला आपट्याची पान देऊन 
पळून जात असतो 

बरं ज्यांना कवी म्हणून आपण माहीत नाही 
त्यांचं तर एकच पालुपद 
" तुझं काय चालतं गड्या काई केल्या कळत नाही 
क्षणात तुघलक क्षणात शिवाजी "

कवी लोकही आपल्या झक्कीपणाला कावलेले 
"तू कावळ्याच्या नाकावर चिमण्या शोधणार 
आणि मिरजकर तिकटीवर दिल्लीची तिकीट शोधणार 
आता राष्ट्रपती भवन काय तुझ्या जैन गल्लीत शिफ्ट करायचं ?"

सालं खूप वाटतं स्वभावाचं कायतरी व्हावं 
पण स्वभावाच्या नुसत्या कविता होतात साल्या 

माणूस मरतो तेव्हा त्याचा स्वभावच मरत असावा बहुदा 
किंवा स्वभाव मेला कि माणसे मरत असावीत 

मर 

श्रीधर तिळवे नाईक 

 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून 

मी सर्वांच्याच विरोधात आहे 
मी सर्वांच्याकडून मारला जाईन 

जुनं ते सोनं म्हणणाऱ्या काळात 
मी 
नवं ते प्लॅटिनम म्हणत 
ओरडत चाललोय 

गंजलेल्या तलवारींना फक्त गांजलेले लोक कवटाळतात 
खरा क्रांतिकारी नवी शस्त्रे तयार करतो 

माझे सर्वांच्यावर प्रेम आहे 
आणि प्रेम हत्येला निमंत्रण देते 

मी कधीही मारला जाऊ शकतो 
ही खबर तर रोज खबरी देत असतात 

सर्वांच्यावर प्रेम करणारा संन्यासी 
हा सर्वाधिक डेंजरस असतो कुठल्याही युगात 

माझा प्रतिकारही प्रेम आहे 

म्हणूनच मी प्रेमसज्ज होऊन सिद्ध आहे मरायला 

मारतांना गंजलेल्या तलवारी घेऊन येऊ नका मित्रांनो 
निदान न्यू मेक  रिवोल्वर वा पिस्तूल घेऊन या 

मरतांना तरी समाधान द्या 
मी नवता हातात धरायला भाग पाडलं 

श्रीधर तिळवे नाईक 


 एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार ह्या काव्यफाईलीतून