Friday, February 24, 2017

गाथा 2
बसवण्णांसाठी श्रीधर तिळवे नाईक 

अंगाचे आमच्या लिंग करता सुटे झालात  बसवण्णा 
भक्तांना वाऱ्यावर सोडून कुठे गेलात बसवण्णा 

जात तोडली वर्ण तोडले मूल्य दिले श्रमांनाही 
शून्य मांडून जग सत्य म्हणालात उखडले भ्रमांनाही 
अनुभवमंडपात अनुभव  कल्याणमंडपात कल्याण 
संकेतांना सौंदर्य दिले संगीत दिले क्रमांनाही 

महालिंगाच्या कुठल्या स्पंदात नेमके डोललात बसवण्णा 
भक्तांना वाऱ्यावर सोडून कुठे गेलात बसवण्णा 

दफ्तरांतील वाढली रद्दी पाठकणा वजनदार झाला 
हैप्पी एंडचा अस्त  होऊन सिनेमा दारोदार झाला 
नेसलेली वस्त्रे गळली तरी झालो नाही नागडे 
गन्जल्या  पादुका त्वचांच्या   गॅंग्रीनचा प्रहार झाला 

लिंगैक्य होण्याआधीच गायब झालात बसवण्णा 
भक्तांना वाऱ्यावर सोडून कुठे गेलात बसवण्णा 

मृत्यू वाचता कसे जगणाऱ्याने साक्षर व्हावे 
मरणाऱ्याने मरणाआधी अमरत्वाचे कसे नाव घ्यावे 
पण मोक्षच जर जाऊ लागला अवचित सुट्टीवरती 
सेट थेरीतल्या  जीवाचे शून्यात  कसे सार्थक व्हावे 

सगळ्याच का गणितांचा   प्रकाश नेसलात बसवण्णा ?
भक्तांना वाऱ्यावर सोडून कुठे गेलात बसवण्णा ?

केस मोकळे सोडले कि ओलांडल्या विश्वसीमा 
काय नेमके झाले तुम्हा मला अजूनही समजेना 
झाड नाही मूळ नाही फक्त उरली वाळली फुले 
वास त्यांचा होऊ शकतो का प्रवासाच्या खाणाखुणा 

वचनांची कोळिष्टके माझ्या हातापायांत  बसवण्णा 
भक्तांना वाऱ्यावर सोडून कुठे गेलात बसवण्णा ?

वाजले सुरेल वाद्य तेव्हा वाजते म्हणून आनन्दी झालो 
नीट वाजले नाही तेव्हा वाद्य मोडून आनंदी झालो 
नवे वाद्य बनवतांना  कासावलो  कधी  त्रासलो  
मात्र तयार झाले तेव्हा नवे म्हणून आनंदी झालो 

मुळात  बांबू कसा लागला  सांगता  गेलात बसवण्णा 
भक्तांना वाऱ्यावर सोडून कुठे गेलात बसवण्णा ?

प्रत्येक सिद्ध साईट होतो नकाशा स्नायू आवळतो 
भिंतींनाही चष्मे लागतात दरवाजा गॉगल कवटाळतो 
आरंभापासून शेवटाला जाणण्याचा उनाड मोह 
तुमच्याच उजेडात उगवतो तुमच्याच उजेडात  मावळतो 


बोलवा तुमच्या मागोमाग  मला तुमच्यात बसवण्णा 
नका जाऊ वाऱ्यावर सोडून कुठे गेलात बसवण्णा ?






श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
स्वामी विवेकानंदासाठी 

मला नाही झेपत आहेत ही मोक्षाची पिसं 
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा व्हा नाहीसं 

माझं स्मित खोळंबलंय अध्यात्मिक अडचणीत 
मध त्वचेचा खाणारा रोज खातोय मीठ 
स्निग्धतेचा दरवळ सुद्धा वाटतोय अवघडलेला 
गाणीसुद्धा येत नाहीत ऐकू मला नीट 

समुद्रसुद्धा दारी येऊन हसतोय कसनुसं 
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा व्हा नाहीसं 

तुम्ही देताय दृष्टांत कि हा आहे भास 
संशयाचा वारा माझा दाबतोय प्रत्येक श्वास 
गवताच्या टेबलावरती ठेवताय तुम्ही वड 
बारीकबारीक केसाएव्हढेही  दिसतात स्पष्ट पाश 

तुम्ही सांगताय राजयोग मला दिसतायत कुसं 
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा व्हा नाहीसं 

लाईट सेट केलीये स्पर्धात्मक परीक्षेची 
पण करताना अभ्यास तुमची लागते उचकी 
पाण्याच्या आवाजानं दचकून उठते बाटली 
तुम्ही ठाकता समोर मारत मला टिचकी 

दोस्तांना वाटतंय झालंय राजाचं भूसं 
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा व्हा नाहीसं 

कुणाकुणाला सांगू तुम्ही मला दिसता 
राजयोगात पत्यांसारखा माझा देह पिसता 
शंका कुशंका विचारण्याआधीच तुम्ही देताय उत्तरं 
वर आणि विचारता वॅनिला कि पिस्ता 

अंधारातही तुमचं शरीर भिंतीमधून घुसतं 
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा व्हा नाहीसं 

सूर्यसुद्धा काळजातले लागलेत थरथरायला 
मुक्तीच्या सुया लागलेत मेंदूत बागडायला 
आई म्हणते राजा तुला झालंय तरी काय 
का जातोयस पत्र्यावरती ढुंगण टेकवायला 

भाऊसुद्धा काढायला लागलेत रोज माझी पिसं 
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा व्हा नाहीसं 

तुमच्यामुळे ज्वालामुखी भरतकाम करतायत 
बागांमधली सफरचंदं बियांमध्ये परतायत 
चारकोलने लिहिलेले काळेकुट्ट इतिहास 
आंघोळ करून अंगावर पांढरा रंग शिंपडतायत 

तलवारींचीही झाली माझ्या घरात कासवं 
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा व्हा नाहीसं 

माश्यांनी माजवलीये जरी रक्तात अंधाधुंदी
सूर्यप्रकाश जरी येऊन पितोय माझी चांदी  
शाकाहाराचा स्केल आहे रोज आता वाढता 
खाटीकसुद्धा घरी येऊन वळतोय बुंदी 

आईला हवं आहे खाण्यासाठी नुसतं 
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा व्हा नाहीसं

सिगरेटच्या धुरामध्ये गॅलऱ्या जळत नाहीत 
लायटरमध्ये पूर्वीसारखे पर्वत विरघळत नाहीत 
माऊथ ऑर्गन बसलाय बटाट्यासारखा फुगून 
द्राक्ष्यांच्या टापांमधून घोडे उधळत नाहीत 

गुलाबांच्या काळजातही दगड ठुसठुसं 
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा व्हा नाहीसं

तुम्ही म्हणालात म्हणून काय काय खोडलं 
पाळलेल्या कबुतरांना हवेमध्ये सोडलं 
मेलेल्या लाकडांचे चाळे सहन केले 
स्वतःचंच रक्त मी स्वतःपासून तोडलं 

एकतर मोक्ष द्या नाहीतर कसं ?
स्वामी तुम्ही अंतर्धान पावा व्हा नाहीसं
श्रीधर तिळवे नाईक

(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
 एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार

अग्नी म्हणे सूर्याला तू तर माझी मोठी बॉडी
सूर्य म्हणे अग्नीला तू तर माझा फक्त कबाडी

अग्नी म्हणे मी तर आहे दैवीपणाचे सूक्ष्म रूप
सूर्य म्हणे माझ्यामुळेच दैवी प्रकाश  पिवळी धूप

अग्नी म्हणे माझ्यामुळेच आयुष्याचा बर्फ पिघळतो
सूर्य म्हणे माझ्यामुळे साक्षात हिमालय वितळतो

ईश्वर म्हणे तुम्ही माझी  दोन रूपे सूक्ष्म स्थूल
तुमच्यामुळे सूर असुरांत वेगळी झाली धार्मिक चूल

ईश्वराचे ऐकून केला दोघांनीही शेकहॅण्ड
माणूस मात्र अजून वाजवतो दोघांचे दोन बॅण्ड

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )


श्रीधर तिळवे नाईक 

काल बारा जणांना एन्लायटन्मेंट मिळालीये म्हणणारा रजनीश 
दुसऱ्या दिवशी मी चेष्टा करत होतो म्हणतो 
तेव्हा कुणाचा भरवसा धरायचा 

साला ह्यांच्या जीवावर आपण फॉर्म भरले 
आणि हे असे निकालफिरवू गुरु 

ह्यांना काय गाढवाच्या गांडीत घालायचंय ?
कि ह्यांची पुस्तकं जाळायची ?

बरं झालं ह्याच्या आश्रमात खोल घुसलो नाही 
नाहीतर दलदलीत गुदमरून मेलो असतो 

श्रीधरा 
आता फक्त तू आणि तुझा मोक्ष 
दारूच्या बाटल्या खूप झाल्या आणि चकणाही 
अध्यात्मिक बारमध्ये एन्ट्री बंद 

आता आपणच आपले गुरु 
आणि आपणच आपले शिष्य 

बघ सूर्य उगवलाय 
आणि हे सत्य कन्फर्म करायला 
कुठल्याही भुक्कड गुरुची गरज नाही 
श्रीधर तिळवे नाईक

एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार

दुःखांनो श्रीधर तिळवे नाईक
दुःखांनो या पण जाताना शहाणे करा 

काळ्या फुलांप्रमाणे तुमचा काळा चेहरा 
रापलेला तापलेला तुमचा प्रदेश गहिरा 
तुम्ही माझ्या अस्तित्वाचे अपरिहार्य भाग 
गाणारा असूनही जो कानाने आहे बहिरा 

जगतो आहे जगण्याचे माझ्या गाणे करा 
दुःखांनो या पण जाताना शहाणे करा 

मिशनरी वर्क तुमचे चालू माझ्या आसपास 
साडेसाती बनून तुमचा सुरु पाठलाग 
उत्तेजना ऑन करता जखमा बनवता खाजगी 
कविता असते तुमचाच उरलेला डाग 

कवितांना माझ्या तुमच्याप्रमाणे  करा 
दुःखांनो या पण जाताना शहाणे करा 

डोळ्यात माझ्या आहे तुमचे एकटेपण 
सोसत राहते आतल्या आत तुमचे खोटेपण 
नकाशांना आयुष्याच्या तुम्ही केले कागद 
संडासातही झालात तुम्ही तरतरीत दर्पण 

प्रतिबिंबाना साऱ्या अंगवळणे करा 
दुःखांनो या पण जाताना शहाणे करा 

दुःख आहे दुःखाचे तृष्णा हेच मूळ 
उपटून काढावी लागते तीच त्यामुळे समूळ 
वागू द्या मलाही गौतम बुद्धाप्रमाणे 
बनवा माझे शरीर करूणेचे  कुळ 

निर्वाण  मिळेल असे ताणेबाणे करा 
दुःखांनो या पण जाताना शहाणे करा 

संन्यासी आहेस
बुद्धापासून शंकराचार्यापर्यंत
बसवेश्वरापासून ओशो जीकेपर्यंत
सगळ्यापासून संन्यास घे

कटोरा आहेस
जी उपजीविका कटोऱ्यात पडेल
तिने जीव जगव
लोकांना काय सोशल रोल हवे असतात
तू कटोरा सोडू नकोस

पैसे खिश्यापुरतेच कमव
आजचा खिसा आजच फाड

नागडा रहा सर्व स्पॉन्सर कपड्यात
घरे भाड्याने घे
मालकी गुलाम बनवते

जे आत आहे तेच बोल
गांडू असशील तेव्हा गांडू आहेस असच म्हण



मुमेंट टू मुमेंट
जगू नकोस
 फक्त अस

आत्ता ह्या क्षणी ही कविता 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )

शैव धर्म म्हणून काय बघू ?रामकृष्ण परमहंस कि महालिंगावरचे दूध ?
हिंदू धर्म म्हणून काय बघू ?मनुस्मृती कि विवेकानंद ?
बौद्ध धर्म म्हणून काय बघू ? अवलोकितेश्वराच्या कथा कि जे कृष्णमूर्ती ?
जैन धर्म म्हणून काय बघू ? नग्न साधू कि आचार्य रजनीश ?
वैष्णव धर्म म्हणून काय बघू ? गीता कि भक्तिवेदांत ?

काहीच तर स्थिर नाहीये ह्या जगात 
आणि लोक बर्फात डुबक्या घेत 
नदीवर बोलतायत 

धारणांची धरणं बांधून 
स्वतःलाच पाणीपुरवठा करणाऱ्या मुन्सिपालट्या 
कधीपासून धर्माधिकारी झाल्या ?

आणि हे तथाकथित विचारवंत 
ज्यांना बर्फ दिसतो धरणं दिसतात 
पण समुद्र व नद्या दिसत नाहीत 
त्यांचे काय करायचे ?

लोक मंदिरात जाऊन श्रद्धेचे थम्सप पितायत 
तर त्यांना सांगा 
जुना धर्म तात्पुरता चांगला वाटला 
तरी आरोग्यास हानिकारक आहे 

थम्सपच्या बॉटलमध्ये उतरून 
समुद्रात पोहता येत नाही 

बॉटल्समध्ये सडलेले जीन्स असतात 
ज्यांना कुणाच्याच इच्छा पुऱ्या करता येत नसतात 
ते फक्त पिण्याची किक देतात 
आणि नाहीसे होतात 

जा लोकांना सांगा 

"थम्स डाऊन प्लिज "

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
आवाज
 श्रीधर तिळवे - नाईक 

आयुष्य उत्सव म्हणून साजरं करणं 
हे आकलन 
कि पलायन ?

आपल्या संसाराच्या आवाज क्षेत्राच्या मर्यादा 
कोण निश्चित करत ?

सगळं सामाजिकच असेल तर 
फक्त माझा संन्यास हाच बंड ?

आवाज उठवणे म्हणजे क्रांती ?

आपले आवाज इतके बसले आहेत का 
कि त्यांना उठवणे ही क्रांती ?

माझा गळा बसलाय 
कि फार पूर्वीच तो मला बसवला गेलाय ?

भाषा देण्यात येते 
गळाही ?

मग माझ्या आवाजाचा 
खाजगीपणा तो काय 
कि त्याचेही खाजगीकरण 
सरकारच्या हातात आहे ?

दहशतवाद हा आवाजाचा टोकेरी प्रकार आहे ?

मग बाहेर ज्या आवाजाच्या किंकाळ्या चालू आहेत 
त्या काय आहेत ?

कि ही धर्माची समाजमान्य हुकूमशाही आहे ?

कि आतला आवाज कुणी ऐकू नये 
म्हणून करण्यात आलेली ही व्यवस्था आहे ?

आता सर्व आवाज झाडता यावेत म्हणून मी ही हत्तीचे कान 
बसवून घ्यावेत काय ?

मी प्रश्न विचारतोय 
आणि लोक माझे विसर्जन करण्यासाठी 
एकत्र होतायत 

श्रीधर तिळवे - नाईक 
 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या काव्यफाईलीतून)

५८

किती रद्दी कोंबली तुम्ही माझ्या मेंदूत 
मी तर जन्मलो तेव्हा कोरा कागदही नव्हतो 
तुम्ही माझा आत कागद तयार केले 
वर्तमान छापले 
आणि रद्दी नष्ट करण्याची कसलीही जबाबदारी  उचलता 
रद्दी जगवण्याची  शिक्षा ठोठावून 
आसपास वावरायला लागलात 

रोज स्वतःला पब्लिश करताना 
रोज स्वतःला पब्लिक बनवताना 
मी अस्वस्थच राहिलो माझ्या मेंदूत 

आत्मामनअस्तित्वव्यक्तित्व 
सर्व गोष्टींवरचा विश्वास उडालेलो मी 
आपला मी फक्त बनवण्यात आलाय 
ह्या विचारानेच जळत  राहिलो आतल्या आत 

आता तर क्षुद्र आणि टिनपॉट  
ह्या विशेषणांनीही साजरा करवत नाही 
क्षुद्रतेचा यक्तिंचीत उत्सव 

आलो 
जगलो 

मेलो 
म्हणावे तर मरणही माहित नाही काय आहे ते 
हे शरीरच आहे पहिले आणि शेवटचे अंतिम सत्य 
बाकी फक्त 
कवितेचा काल्पनिक कारभार 

चालतोय तोवर सरकार आहे 
कोसळला की माहित नाही 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
बाजू 
प्रथम एकाच बाजूला उभं राहता येतं 
दोन्ही बाजूला फक्त संत उपस्थित असतात 
आणि सर्व बाजूंना ईश्वर 

जे घडतंय 
त्याला माझी उपस्थिती जबाबदार नाही

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***


ह्या नश्वर जगात 
माझं नश्वर अस्तित्व घेऊन 
मी जगतोय  
माझा नश्वर आनंद 

क्षणभंगुरतचे क्लासेस लावून 
क्षणभंगुरतेचा सिलॅबस 
आत्मसात करता येत नाही

आपण एक क्षुद्र आहोत 
हा आपला सन्मान आहे की अपमान 
हे ठरवणं 
कठीण होतय 

कितवं ते माहीत नाही पण 
हिमयुग संपून जन्मलेली 
आयुष्याची नवी कोरी मूठ 
जिचा फक्त पंजा आपल्या हाती 
आणि मोजायला अनंत बोटं 

हा एक विलक्षण तणाव आहे 
हा एक विलक्षण बनाव आहे 

एक पाण्याचा थेंब थरथरतोय 
आणि अवघी पृथ्वी आपल्या शरीरात 
डोळे रोखून- दार्शनिक 

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***
एकतर गॉड आहे 
किंवा ऑड आहे 
ज्याला इव्हन बनवण्याचा प्रयत्न चालू आहे 
आणि ज्याला अटेनिंग हेवन म्हंटल जातं 
आणि जो असाध्य आहे 

जो जगताना असाध्य आहे 
तो निदान कल्पनेत तरी साध्य व्हावा म्हणून 
मरणोत्तर हेवन आहे हेल आहे 

ऑडमधून ऍडम आलेला आहे 
इव्हनमधून ईव्ह आलेली आहे 
आणि दोघेही हेवन मधून आलेले आहेत 
आणि जगताना हेवन असाध्य आहे 
म्हणून जगण्यात सैतान आहे 
ज्ञानाचे ऍपल आहे 
आणि ऍपल खा म्हणणारा आग्रह आहे 

आग्रहात भाषा आहे 
आणि भाषा ईश्वराच्या आधीची आहे 
कारण प्रथम शब्द होता असं बायबल म्हणतं 
भाषेतून गॉड आलेला आहे 
आणि त्याने हेवन मधून ऍपल खाल्ले म्हणून 
ऍडम आणि ईवला 
पृथ्वीवर धाडले आहे 
जे ऑड आहे 

जे ऑड आहे 
ते इव्हन नाहीये 
आणि म्हणूनच ते इव्हन बनवण्याचा प्रयत्न चालू आहे 
ज्याला अटेनिंग हेवन म्हंटले जाते 
जे असाध्य आहे 

जे जगताना असाध्य आहे 
ते निदान कल्पनेत तरी साध्य व्हावे  म्हणून 
मरणोत्तर हेवन आहे हेल आहे 

ऑडमधून ऍडम आलेला आहे 
इव्हनमधून ईव्ह आलेली आहे 
आणि दोघेही हेवन मधून आलेले आहेत 
आणि जगताना हेवन असाध्य आहे 
म्हणून जगण्यात सैतान आहे 
ज्ञानाचे ऍपल आहे 
आणि ऍपल खा म्हणणारा आग्रह आहे 

आग्रहात भाषा आहे 
आणि भाषा ईश्वराच्या आधीची आहे 
कारण प्रथम शब्द होता असं बायबल म्हणतं 
भाषेतून गॉड आलेला आहे 
आणि त्याने हेवन मधून ऍपल खाल्ले म्हणून 
ऍडम आणि ईवला 
पृथ्वीवर धाडले आहे 
जे ऑड आहे 

जे ऑड आहे 
ते इव्हन नाहीये 
आणि म्हणूनच ते इव्हन बनवण्याचा प्रयत्न चालू आहे 
ज्याला अटेनिंग हेवन म्हंटले जाते 
जे असाध्य आहे 

आणि हे असे 
पुन्हा पुन्हा 
अनंतवेळा  
श्रीधर तिळवे नाईक 
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )


मला कुठल्याच जागा कधी सफळ संपूर्ण वाटत  नाहीत 
किंवा कुठलीच जागा सोडतांना मी अनकंफर्टेबल होत  नाही 

मी प्रवासीच आहे  जनेटिकली 
आणि आत आणि बाहेर प्रवास करण्यासाठी 
माझा जन्म झाला आहे 

देह हेही माझ्यासाठी टुरिस्ट स्पॉट आहेत  
जिथे मी थांबतो आणि निघतो 

तुझ्या सरोवराची कमळं पॉवरफुल होती 
आणि रक्तातल्या बर्फाच्या जागा डागविरहित होत्या 

पण ह्याने काय होणार ?

समुद्राच्या शोधात निघालेल्या माणसाला 
सरोवर बांधून ठेऊ शकत नाही 
आणि पावसाळे तर तो आपल्या व्होचरमध्ये टाकून फिरतो 

तुझ्या अन्नासाठी आणि पाण्यासाठी आभार 

पावलांच्या सावल्या सोडून चाललोय 

त्यांच्यात अडकू नकोस 

आपल्या सेक्सइतक्याच त्या क्षणभंगुर आहेत 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
काळजातील डेली सोप
पोकळी शून्यावर भर देतीये 
आणि शून्याला भार वाटतीये 

पोकळीला वाटतंय तिचं वजन वाढत चाललय
आणि शून्य स्वतःचा शेवट शोधत 
आरंभात गरगरतय  

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***

सांत मुक्तीचे सांत क्षण अनुभवत 
कितीकाळ अनंत मुक्ति 
पेंडींग ठेवणार ?

इनफिनीट झीरीच्या अनंत तऱ्हा 
रोजनदारी उगवतायत म्हणून 
फैलावत चाललेला हा आत्मविकासाचा प्रोग्राम 
कधीच रद्द होणार नाही का ?

माझ्यात एक अध्यक्ष आहे 
पंतप्रधान आहे 
त्याचे सत्तेचे राजकारण 
पार्ट्या बदलत सतत चालू 
ह्या आयाराम गयारामाच्या वळचणीला 
माझे अस्तित्व पडून रहावे
ह्याहून शोकात्म ते काय ?


मुक्तीची किंमत - NOTHINGNESS 
ती मोजायची तयारी नाही तोवर 
समथिंग समथिंग गोईंग गोईंग  

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून
***


आयुष्य निरर्थक आहे 
पण त्यापेक्षाही अधिक निरर्थक आहे आत्महत्या 

आयुष्य सार्थक करण्यासाठी 
कितीकाळ हे सारथ्य  करत राहणार ?

मी जगतोय कि उपाय नाही म्हणून स्वतःला  जगवतोय ?

चालणे आणि चालवणे  

चालताना पाय थकतील
चालताना हात थकतील
दोन्हीत मेंदू थकेलच थकेल 

संपूर्ण रिता झालेला मेंदू 
कुणाला गवसलाय ?

दावे अनंत आहेत 
दावेदार पोकळ 

शून्यमडीत आणि शून्यजडीत
काय आहे ?

मी जगतोय कि उपाय नाही म्हणून स्वतःला  जगवतोय ?

कळण्याचे सामर्थ्य संपत चाललय 
जे मर्त्य आहे ते आमर्त्याला काय जाणणार 

कळणे आणि कळवणे 

सर्वत्र जगजगाट 
आणि मी त्याचा झगमगाट 

आत्महत्येने कळवलय
मी आयुष्यापेक्षा अधिक निरर्थक आहे 

      
(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***


तूच ठरव 
किती फॉलोआन घेऊ 
किती वेळा स्कोर शून्य 
लीड घेऊन देईल असे 
भेटणार कधी चैतन्य 

किती आखले चक्रव्यूह
कानमंत्र किती फुंकले 
खेळताना प्रत्येकवेळी 
चेंडूचे जजमेन्ट चुकले 

एकतर्फी लढती आता 
'हार' ही झाली सवय 
असे  होणार नाही ना 
विजयाचेच  वाटेल भय 

दे तूच हाती माझ्या 
जादूची मिरॅकल बॅट 
जी काढेल त्रिशतके 
देता स्वतःची विकेट 

तू ऐकणार नाहीस कधी 
आहे हे  मला ठाऊक 
मी क्रिकेट कायमचे सोडले 
तूच ठरव बरोबर कि चूक  

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***



मी 

किती घातले  ग्रह पालथे 
आसपास पण नाही माणूस 
खोल वाकून मी पाहिले
ईश्वराचा नाही टिपूस 

मी नागरिक  ओसाडीचा  
ही विराणता हेच प्राक्तन ?
अवाढव्य  मग का पसारा 
अगम्य का हे  मूलभूत कण 

अपघात अपघात  असतो 
अपघाताचाच का मी उत्सव 
योगायोगाच्या योगात 
आहे  भोग का हा  बेचव 

मी मेख ओळखली असती 
मी सोडवले असते कोडे 
देवाचा   मागमूस नाही 
फक्त मांस मांसाला जोडे 

आता  बनतो मीच ईश्वर 
व्यापतो हे सारे ब्रम्हांड 
अपघाताने जे लिहिले ते 
 पुरे करतो प्लॅनिंगने  कांड 

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***



आत्मसाक्षात्कार -

कसा भरवसा धरू मी माझा 
कसे म्हणू की ताजा हर कण 
हा क्षण आहे जर का माझा 
मागिल क्षणाची पुढील एडिशन 

उजळण्याचे जळण रोजचे 
हाडांचे का लाकूड  जाळावे 
जुने उंदीर पकडण्यासाठी 
मांजर का मी नवे पाळावे 

सनातनाचा नाही पत्ता 
चिरंतनाचा नाही ऍड्रेस 
नवे होईल काही  म्हणून 
नवेनवे का घालावे ड्रेस 

का मी घ्यावी हाय रिस्क अन 
का मी मरावे जुन्या खिंडीत 
लोक  लागले म्हणू आता 
श्रीधर केवळ पढत पण्डित 

क्षमता नाही नव होण्याची 
माझी हीच  मूळ मर्यादा 
आवरतो पाऊले माझी 
हेरक्लिटसच्या वाहु  द्या नद्या

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***


आत्मसाक्षात्कार -
कसले झेन नि  कसले ध्यान 
पलायनाच्या विनम्र रांगा 
मटका लागला तर तू बुद्ध 
नाहीतर कोंबड्याच्या बांगा 

ज्या घराला  दारच नाही 
त्याच्या केन्द्रात तुझा थर 
जरतर जरतरच्या कारभारी  
तुझी उपस्थि निकम्मी भर 

मॅनेजमेंटचा ससा हो तू वा 
आयडियालॉजीचे कासव 
बाण सारे  मधे तुटणारे 
धनुष्य शेवटी कितिही ताणव

मनुष्य जन्म म्हणजे मेडल 
देऊन  उत्क्रांतिने टाकले 
सरळ अर्थ  शोधत शोधत 
भलेभले कमरेत वाकले 

येरागबाळ्याचे काम 
चिरंतनाचा घेणे ठाव 
निघणार तू तर निघ बाबा 
माझा क्षणिक बरा हा गाव 

श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***

रात्र जाते  टांगून  स्वप्न  
खुंटा बनती थकली   हाडे 
ऋतूवहीतली  पृथ्वी म्हणते 
भविष्यातले  हिरवे  पाढे 

नाडीखालचा थंड नव्हेंबर 
शीळ घालतो शिशीराची 
तू गळणार का मी गळणार 
पानांमध्ये बाचाबाची 

टाकत टांगा लांब लांब 
क्षितिजी जाऊन धुळीस मिळतो 
आईच्या दंतकथेतला 
देवमासा समुद्र गिळतो 

समुद्र मोजून काळजातला 
लाटादेखील होती  शांत 
उद्या जीवन्त नक्कीच असणार 
खात्रीने मी  झोपतो निवांत 

****

दंतकथांना हरवून रिचवेन 
सत्याचे मी महासमुद्र 
भविष्यवाणीचे मी पोपट 
मुरगाळून बनेन शूद्र 

शब्द करतील  जरी पराभव 
कविता बनवेन  भुईकोट किल्ला 
शंकरशाळा करून शोधेन 
कुठे कुठे तुम्ही मारला डल्ला 

प्रतिनाद जादूचे चुकवून 
शोधून काढेन मूळ सूर 
कागदी होड्या दाखवून तुम्ही 
किती सिद्धले  खोटे पूर 

सावध असा जरी मी कवी 
बसवण्णांचे माझे कूळ 
समुद्र म्हणून ज्यास घाबरता 
ती असते माझी चूळ 

****
लेखन 

संगीताच्या करा व्याख्या 
कवितांचे शोधा फॉर्म्युले 
सापडणार काहीच नाही 
इथे काळजाचे राज्य चाले 

सिद्धांताच्या करून नोकऱ्या 
जास्तीत जास्त व्हाल प्राध्यापक 
पोर्णिमेवर  मिळेल प्रभुत्व ?
कि चंद्रासम व्हाल टकाटक ?

रक्तामधला कवितादाब 
थोडाच आहे रक्तदाब ?
आमच्या पेनास  फळतो कारण 
आम्ही त्याचा राखतो आब

बोटे जरी आहेत किल्ल्या 
आम्हांस नाही ठाऊक कुलुप 
लिहितांना शब्द म्हणतात  
तेरीभी चूप मेरीभी चूप 

 फिलिंगचे फ्रेश क्लोरोफिल 
सगळ्या सेन्सचे करते फ्युजन 
आम्ही डोंगर ठेऊन मरतो 
तुम्ही शोधता आमचे व्हिजन 

मी शिवाचा आहे अवतार 
मी शब्दाचा आहे हनुमान 
 सूर्य जरा मी गिळून येतो 
तोवर शोधा तुम्ही विमान 

***
वाचन 

मर्ढेकरांचे उडतात फुगे 
करंदीकरांचे हलके बबल 
जरी देतात नॉशिया तरी 
करतात माझे स्पीरीट डबल 

आजारांचे  मूळ प्राचीन 
खाते पॅटर्नमधले पॅटिस 
एकदम हळवे लागतात दिसू 
दिसत असतात जे डॅम्बीस 

शिशिरागमनाचा धुराळा 
उठतो आणि खाली बसतो
ज्या सशावर विश्वास ठेवला 
तोच स्पर्धेखालून डसतो  

निरोप देतांना दोघांना 
आरोपांच्या उडतात फैरी 
झाडाखाली जाऊन वाचतो 
मी जी एंची निवांत  कैरी 

***

मरा मरा 
ईश्वराचे भूत उरले 
प्रेत पुरून पुरून उरले 
भक्त देखील सारे वारले 
स्मशान जिवंत 

अमरत्वाची मधमाशी 
खाऊन काबा खाऊन काशी 
म्हणे मी अजून आहे उपाशी 
म्हणावे का तिला संत 

अस्तित्वाचे बायोस्फीअर 
आत्म्याचा ना गवसे थर 
तरी देह कापे थरथर 
ही खंत की हा अंत 

मेल्यानंतर काहीच नाही 
मरण्यात काय मग मजा बाई 
क्षणभंगुर शेवटची सही 
हंत हंत हंत हंत 

मधोमध आपुला शेवट 
पुढे मागे लाखो कट 
कुठेच नाही कसली फट 
मरा मरा श्रीधर पंत   

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून



***



मला कुठल्याच जागा कधी सफळ संपूर्ण वाटत  नाहीत 
किंवा कुठलीच जागा सोडतांना मी अनकंफर्टेबल होत  नाही 

मी प्रवासीच आहे  जनेटिकली 
आणि आत आणि बाहेर प्रवास करण्यासाठी 
माझा जन्म झाला आहे 

देह हेही माझ्यासाठी टुरिस्ट स्पॉट आहेत  
जिथे मी थांबतो आणि निघतो 

तुझ्या सरोवराची कमळं पॉवरफुल होती 
आणि रक्तातल्या बर्फाच्या जागा डागविरहित होत्या 

पण ह्याने काय होणार ?

समुद्राच्या शोधात निघालेल्या माणसाला 
सरोवर बांधून ठेऊ शकत नाही 
आणि पावसाळे तर तो आपल्या व्होचरमध्ये टाकून फिरतो 

तुझ्या अन्नासाठी आणि पाण्यासाठी आभार 

पावलांच्या सावल्या सोडून चाललोय 

त्यांच्यात अडकू नकोस 

आपल्या सेक्सइतक्याच त्या क्षणभंगुर आहेत 


श्रीधर तिळवे नाईक

(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )


काळजातील डेली सोप
पोकळी शून्यावर भर देतीये 
आणि शून्याला भार वाटतीये 

पोकळीला वाटतंय तिचं वजन वाढत चाललय
आणि शून्य स्वतःचा शेवट शोधत 
आरंभात गरगरतय  

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***

सांत मुक्तीचे सांत क्षण अनुभवत 
कितीकाळ अनंत मुक्ति 
पेंडींग ठेवणार ?

इनफिनीट झीरीच्या अनंत तऱ्हा 
रोजनदारी उगवतायत म्हणून 
फैलावत चाललेला हा आत्मविकासाचा प्रोग्राम 
कधीच रद्द होणार नाही का ?

माझ्यात एक अध्यक्ष आहे 
पंतप्रधान आहे 
त्याचे सत्तेचे राजकारण 
पार्ट्या बदलत सतत चालू 
ह्या आयाराम गयारामाच्या वळचणीला 
माझे अस्तित्व पडून रहावे
ह्याहून शोकात्म ते काय ?


मुक्तीची किंमत - NOTHINGNESS 
ती मोजायची तयारी नाही तोवर 
समथिंग समथिंग गोईंग गोईंग  

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून
***


आयुष्य निरर्थक आहे 
पण त्यापेक्षाही अधिक निरर्थक आहे आत्महत्या 

आयुष्य सार्थक करण्यासाठी 
कितीकाळ हे सारथ्य  करत राहणार ?

मी जगतोय कि उपाय नाही म्हणून स्वतःला  जगवतोय ?

चालणे आणि चालवणे  

चालताना पाय थकतील
चालताना हात थकतील
दोन्हीत मेंदू थकेलच थकेल 

संपूर्ण रिता झालेला मेंदू 
कुणाला गवसलाय ?

दावे अनंत आहेत 
दावेदार पोकळ 

शून्यमडीत आणि शून्यजडीत
काय आहे ?

मी जगतोय कि उपाय नाही म्हणून स्वतःला  जगवतोय ?

कळण्याचे सामर्थ्य संपत चाललय 
जे मर्त्य आहे ते आमर्त्याला काय जाणणार 

कळणे आणि कळवणे 

सर्वत्र जगजगाट 
आणि मी त्याचा झगमगाट 

आत्महत्येने कळवलय
मी आयुष्यापेक्षा अधिक निरर्थक आहे 

      
(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***


तूच ठरव 
किती फॉलोआन घेऊ 
किती वेळा स्कोर शून्य 
लीड घेऊन देईल असे 
भेटणार कधी चैतन्य 

किती आखले चक्रव्यूह
कानमंत्र किती फुंकले 
खेळताना प्रत्येकवेळी 
चेंडूचे जजमेन्ट चुकले 

एकतर्फी लढती आता 
'हार' ही झाली सवय 
असे  होणार नाही ना 
विजयाचेच  वाटेल भय 

दे तूच हाती माझ्या 
जादूची मिरॅकल बॅट 
जी काढेल त्रिशतके 
देता स्वतःची विकेट 

तू ऐकणार नाहीस कधी 
आहे हे  मला ठाऊक 
मी क्रिकेट कायमचे सोडले 
तूच ठरव बरोबर कि चूक  

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***



मी 

किती घातले  ग्रह पालथे 
आसपास पण नाही माणूस 
खोल वाकून मी पाहिले
ईश्वराचा नाही टिपूस 

मी नागरिक  ओसाडीचा  
ही विराणता हेच प्राक्तन ?
अवाढव्य  मग का पसारा 
अगम्य का हे  मूलभूत कण 

अपघात अपघात  असतो 
अपघाताचाच का मी उत्सव 
योगायोगाच्या योगात 
आहे  भोग का हा  बेचव 

मी मेख ओळखली असती 
मी सोडवले असते कोडे 
देवाचा   मागमूस नाही 
फक्त मांस मांसाला जोडे 

आता  बनतो मीच ईश्वर 
व्यापतो हे सारे ब्रम्हांड 
अपघाताने जे लिहिले ते 
 पुरे करतो प्लॅनिंगने  कांड 

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***



आत्मसाक्षात्कार -

कसा भरवसा धरू मी माझा 
कसे म्हणू की ताजा हर कण 
हा क्षण आहे जर का माझा 
मागिल क्षणाची पुढील एडिशन 

उजळण्याचे जळण रोजचे 
हाडांचे का लाकूड  जाळावे 
जुने उंदीर पकडण्यासाठी 
मांजर का मी नवे पाळावे 

सनातनाचा नाही पत्ता 
चिरंतनाचा नाही ऍड्रेस 
नवे होईल काही  म्हणून 
नवेनवे का घालावे ड्रेस 

का मी घ्यावी हाय रिस्क अन 
का मी मरावे जुन्या खिंडीत 
लोक  लागले म्हणू आता 
श्रीधर केवळ पढत पण्डित 

क्षमता नाही नव होण्याची 
माझी हीच  मूळ मर्यादा 
आवरतो पाऊले माझी 
हेरक्लिटसच्या वाहु  द्या नद्या

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***


आत्मसाक्षात्कार -
कसले झेन नि  कसले ध्यान 
पलायनाच्या विनम्र रांगा 
मटका लागला तर तू बुद्ध 
नाहीतर कोंबड्याच्या बांगा 

ज्या घराला  दारच नाही 
त्याच्या केन्द्रात तुझा थर 
जरतर जरतरच्या कारभारी  
तुझी उपस्थि निकम्मी भर 

मॅनेजमेंटचा ससा हो तू वा 
आयडियालॉजीचे कासव 
बाण सारे  मधे तुटणारे 
धनुष्य शेवटी कितिही ताणव

मनुष्य जन्म म्हणजे मेडल 
देऊन  उत्क्रांतिने टाकले 
सरळ अर्थ  शोधत शोधत 
भलेभले कमरेत वाकले 

येरागबाळ्याचे काम 
चिरंतनाचा घेणे ठाव 
निघणार तू तर निघ बाबा 
माझा क्षणिक बरा हा गाव 

श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***

रात्र जाते  टांगून  स्वप्न  
खुंटा बनती थकली   हाडे 
ऋतूवहीतली  पृथ्वी म्हणते 
भविष्यातले  हिरवे  पाढे 

नाडीखालचा थंड नव्हेंबर 
शीळ घालतो शिशीराची 
तू गळणार का मी गळणार 
पानांमध्ये बाचाबाची 

टाकत टांगा लांब लांब 
क्षितिजी जाऊन धुळीस मिळतो 
आईच्या दंतकथेतला 
देवमासा समुद्र गिळतो 

समुद्र मोजून काळजातला 
लाटादेखील होती  शांत 
उद्या जीवन्त नक्कीच असणार 
खात्रीने मी  झोपतो निवांत 

****

दंतकथांना हरवून रिचवेन 
सत्याचे मी महासमुद्र 
भविष्यवाणीचे मी पोपट 
मुरगाळून बनेन शूद्र 

शब्द करतील  जरी पराभव 
कविता बनवेन  भुईकोट किल्ला 
शंकरशाळा करून शोधेन 
कुठे कुठे तुम्ही मारला डल्ला 

प्रतिनाद जादूचे चुकवून 
शोधून काढेन मूळ सूर 
कागदी होड्या दाखवून तुम्ही 
किती सिद्धले  खोटे पूर 

सावध असा जरी मी कवी 
बसवण्णांचे माझे कूळ 
समुद्र म्हणून ज्यास घाबरता 
ती असते माझी चूळ 

****
लेखन 

संगीताच्या करा व्याख्या 
कवितांचे शोधा फॉर्म्युले 
सापडणार काहीच नाही 
इथे काळजाचे राज्य चाले 

सिद्धांताच्या करून नोकऱ्या 
जास्तीत जास्त व्हाल प्राध्यापक 
पोर्णिमेवर  मिळेल प्रभुत्व ?
कि चंद्रासम व्हाल टकाटक ?

रक्तामधला कवितादाब 
थोडाच आहे रक्तदाब ?
आमच्या पेनास  फळतो कारण 
आम्ही त्याचा राखतो आब

बोटे जरी आहेत किल्ल्या 
आम्हांस नाही ठाऊक कुलुप 
लिहितांना शब्द म्हणतात  
तेरीभी चूप मेरीभी चूप 

 फिलिंगचे फ्रेश क्लोरोफिल 
सगळ्या सेन्सचे करते फ्युजन 
आम्ही डोंगर ठेऊन मरतो 
तुम्ही शोधता आमचे व्हिजन 

मी शिवाचा आहे अवतार 
मी शब्दाचा आहे हनुमान 
 सूर्य जरा मी गिळून येतो 
तोवर शोधा तुम्ही विमान 

***
वाचन 

मर्ढेकरांचे उडतात फुगे 
करंदीकरांचे हलके बबल 
जरी देतात नॉशिया तरी 
करतात माझे स्पीरीट डबल 

आजारांचे  मूळ प्राचीन 
खाते पॅटर्नमधले पॅटिस 
एकदम हळवे लागतात दिसू 
दिसत असतात जे डॅम्बीस 

शिशिरागमनाचा धुराळा 
उठतो आणि खाली बसतो
ज्या सशावर विश्वास ठेवला 
तोच स्पर्धेखालून डसतो  

निरोप देतांना दोघांना 
आरोपांच्या उडतात फैरी 
झाडाखाली जाऊन वाचतो 
मी जी एंची निवांत  कैरी 

***

मरा मरा 
ईश्वराचे भूत उरले 
प्रेत पुरून पुरून उरले 
भक्त देखील सारे वारले 
स्मशान जिवंत 

अमरत्वाची मधमाशी 
खाऊन काबा खाऊन काशी 
म्हणे मी अजून आहे उपाशी 
म्हणावे का तिला संत 

अस्तित्वाचे बायोस्फीअर 
आत्म्याचा ना गवसे थर 
तरी देह कापे थरथर 
ही खंत की हा अंत 

मेल्यानंतर काहीच नाही 
मरण्यात काय मग मजा बाई 
क्षणभंगुर शेवटची सही 
हंत हंत हंत हंत 

मधोमध आपुला शेवट 
पुढे मागे लाखो कट 
कुठेच नाही कसली फट 
मरा मरा श्रीधर पंत   

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून

***


संगीत 
सिग्नेचर ट्यून म्हणावी 
असे आहेत सूर कोठे 
वाद्यावरती  ज्या मी बसतो
त्या वाद्यात   ढिगभर  काटे 

संगीताची सतार म्हणू कि 
रहस्याचा सनातन थाट 
ज्या वाटेवर चाललो मी 
त्या वाटेने लावली वाट 

राग दरबारी नको आता 
जनताभारी नको आलाप 
बुध्दांच्याही शेजारी मी 
यशोधरेचा पाहिला विलाप 

जगा असे तसे वा कसेही 
दुःखापासून नाही मुक्ति 
गांगरल्या आसवांच्या 
नद्या देखील क्षणात सुकती 

व्याकुळतेचा  कावळा काळा 
राजहंसाचा शुभ्र भास 
जी जगलास  होती ऊर्जा 
जगलास ती होती राख 

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***

ट्रान्सटेक्सच्युऍलिटी 
एका क्षणानंतर दुसरा येतो 
पण दुसरा पहिल्याची रिप्लेसमेंट नसतो 

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***

बाजू 
एकाच बाजूला उभं राहता येतं 
दोन्ही बाजूला फक्त संत उपस्थित राहतात 
आणि सर्व बाजुंना ईश्वर 

जे घडतय 
त्याला माझी उपस्थिती जबाबदार नाही 

श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून 
***

औदुंबर -
ऐलथडीला औदुंबर 
पैलथडीला unending 

Now I am realizing

I am the smallest thing 

Transparently unknown 
   

श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून 
***


पूर्व पश्चिम जोडतोय 
तर पूर्वेचा अंत होतोय 
पश्चिमेचा अस्त 

सूर्य कुठूनही उगवतोय  
बाहेरूनही 
आतूनही 

दिशांना सरावलेले पाठलाग करतायत 
माझ्या कुठूनही उगवणाऱ्या सूर्याचा  

त्यांनी चंद्रापासून खास सुरा बनवलाय 
आणि तो ते अंधारावर घासून 
पौर्णिमा चमकवतायत 

त्यांना वाटते कि 
पौर्णिमा म्हणजे निर्वाण 
आणि मी 
माझ्या सूर्याने त्यांची पौर्णिमा प्रकाशित करतोय

मला सूऱ्याची भीती नाही 
सूर्य बाळगणाऱ्यांजवळ ती नसतेच 

फक्त माझ्या मृत्यूनंतर 
आणखी एक निर्वाण 
पोर्णिमेशी जोडले जाईल 
ह्याचा खेद आहे

(श्रीधर तिळवे नाईक 
एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***
समुद्रात थेम्ब हरवत चाललाय
हरवतांना समुद्र गिरवत चाललाय

त्याच्याही बुडाखाली होतं सिंहासन
जडलेला ज्याला पाण्याचा दर्पण

जो आतल्या आत फुटत चाललाय
समुद्रात थेम्ब हरवत चाललाय

आसपास पाण्याचे स्फटिकी हिरे
चांगले वाईट खोटे आणि खरे

अंगठ्यांना  त्यांच्या विरघळवत  चाललाय
समुद्रात थेम्ब हरवत चाललाय

लाटांचा चढाव जशी बढाई
आपापसात चाललेली लुटुपुटु लढाई

खोटे खोटे तिच्यात मरत चाललाय
समुद्रात थेम्ब हरवत चाललाय

विरघळला कि दिसणार नाही
असण्याचा भास आढळणार नाही

असण्याचा भास कोसळत चाललाय 
समुद्रात थेम्ब हरवत चाललाय

श्रीधर तिळवे नाईक 
( एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )