Thursday, August 9, 2018

जुन्या गझला

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

खोटे गुरु पळाले तेव्हाची गझल

म्हातारे गेले ते बरंच झालं
संपले झमेले ते बरंच झालं

मला जुन्याचे आकर्षण नाही
जुने मेले ते बरंच झालं

सोन्याने त्यांनी सजवले प्रेत
सोनेही गेले ते बरंच झालं

गुरूंचा असा उच्छाद होता
पळाले  चेले ते बरंच झालं

मोक्षाचा  लिलाव थांबला
उजाडले  ठेले ते बरंच झालं

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
१९८३ वर्ल्ड कप क्लाइव्ह लॉईडसाठी मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

तो असा काय वाईट वागला जो इथे जिंकला आहे 
जो पराभव इतका  तुझ्या जिव्हारी लागला आहे 

खेळ आहे इथे हारजीत कुणा एकाची होणारच 
जरुरी नाही जिंकणारा वाईट मार्गाने जिंकला आहे 

शक्य आहे त्याच्याकडे काही अधिकची कौशल्ये होती 
आणि  तुला  माहित न्हवती आणि तो ती जगला आहे 

इथे काय घडेल ते कुणी कधीच सांगू शकत नाही 
सर्वात फास्ट बॉलवर इथे दुबळ्याने  षटकार ठोकला आहे 

हिट विकेट होणाऱ्याला इथे चेंडूही क्षमा करत नाही 
तुझ्यावर तर चेंडुसकट खेळ अवघा रुसला आहे 

आज वर्ल्ड कप त्याचा   झाला उद्या पुन्हा दुसऱ्याचा होईल 
आजचा क्षण त्याचा   आहे उद्या कुणाचा  पाहिला आहे 

मी मैदान सोडतांना शेवटपर्यंत पहात राहिलो 
कोणता प्रेक्षक माझी वाट बघत थांबला आहे 

बायकोच्या मिठीत शिरलो अवघा खेळ  विसरून 
सकाळी बायको म्हणाली नवरा संसाराला  लागला आहे 

श्रीधर तिळवे नाईक

(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 
विटगेस्टाईनसाठी एक गझल

जे भाषेत सांगता येत नाही त्यासाठी तर कविता असते
एरव्ही मग सर्वत्रच लंगडणारी भाषा असते

तर्काने कुठवर जाता येईल तर्काला  नसते कल्पना
कल्पनेने  कुठवर येईल जाता माहित कवितेला असते

आयुष्य म्हणजे काही फक्त भाषा नाही मोक्षही असतो
मोक्ष म्हणजे अतिन्द्रीयाने इंद्रियांची भरवलेली शाळा असते

मी काही प्लेटोप्रमाणे स्वतःच्या गुहेत कैद नाही
मी तो आहे जो जाणतो गुहांच्याबाहेरही एक शून्यता असते

मला तुझे तत्वज्ञान थोडे कळाले तुला माझी गझल कळली का
मी इंडियन तत्वज्ञ कवी आहे आमच्यात एक न कळणारी स्तब्धता असते


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

आसक्तीच्या नादी लागून कुठेही जाऊन बसता
मोक्ष मिळेपर्यंत तुम्ही मूर्ख असता

तुम्हाला कळत नाही व्यवहारातील भ्रम
लाटांत वावरत तुम्ही समुद्र अख्खा रचता

काड्यापेटीएवढा असतो शहाणपणाचा हिमालय
जेम्स बॉण्ड बनून तुम्ही त्याच्या बर्फावर नाचता

विवेकाचे सफरचंद झाडापुरते मर्यादित
ते खाऊन समजता जंगल तुमचा  बस्ता

मला माझ्या मूर्खपणाची जाणीव आहे तरीही
मी मुर्खासारखा लिहितो तुम्ही मुर्खासारखे वाचता



श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल 

मशीन मशीनला पाहते आहे
मशिनमधून कोणते मशीन वाहते आहे

मशीन पाहू शकते मोजकेच रंग
मशीनला मोजकेच दिसते काय नाहते आहे

मशीनला मशीन निर्माण करता येते
मशीन मशीनचा मृत्यू वहाते आहे

मशीनलाही येतो कंटाळा मशीनचा
तरीही मशीनला मशीन साहते आहे

मशीनने मरताना मशीनला समजावले
पुढच्या जन्मी भेटू सर्व राहते आहे

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

मी शांततेला शस्त्र म्हणून वापरलं
आणि ते माझ्याकडे खुनी होऊन परतलं

काही लक्ष्यात येण्याआधीच माझा गेम झाला
काही क्षणात  माझ्यापुढे माझं प्रेत पसरलं

भले भले बुद्धिजीवी लोकांपुढे घायाळ झाले
असं कसं संम्मोहन तलवारीसारखं तेजाळलं

सूर्यही गाऊ लागले भर उजेडात अंधारआरती
काळोखाला कवटाळलं कुणी काळोखाला ओवाळलं

ज्याचा त्याचा पुरोगामी विवेक म्हणे होता जागा
मग ते नेमकं काय होत जे होतं झोपी गेलं



श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

हा सत्य शोधण्याचा बहाणा नाही 
मी खरेच सांगतो मी केवळ टरफल आत दाणा नाही 

जो शहाणा असतो तो काहीच जाणत नाही जाणतो 
मी काही गोष्टी जाणतो मी शहाणा नाही 

मी कुठल्याही गोष्टीचे टोक गाठतो 
माझा रेषाखंड मधला त्याला अनंताचा ठिकाणा नाही 

मैत्रीत माझी सुरवात मंद असते 
वेगाने घ्यावा असा हा उखाणा नाही 

मी स्वतःच एक शहर झालो आहे 
गावात परतणार नाही हा बहाणा नाही 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )


मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

मी एकनाथांच्या शैलीतला तुकाराम आहे 
मात्र रामायणातल्या रामाला माझा दुरूनच रामराम आहे 

शैव होता तोवर विठ्ठल चांगला होता 
वैष्णव झाला त्याला दुरूनच सलाम आहे 

राम कृष्ण बहुजनांच्या पायांतील बेड्या आहेत 
ते वर्णजातच आणणार त्यांना दुरूनच प्रणाम आहे 

तीनशे वर्षात एकाही वारकऱ्याला मोक्ष नाही 
भक्तीत उणीव आहे कि मार्गच भटकराम आहे 

मी जातो महादेवामागे तिथेच काही होईल 
निदान वर्णजात सुटेल तिथे शुद्ध  आयाम आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

आभाळाला मारला लकवा ढग कोसळले 
इथे तिथे आजारी पाणी सळसळले 

समुद्राचा ग्लास अर्धा रिता कि अर्धा भरलेला 
प्रश्न विचारणारे जहाजातून समुद्रात कोसळले 

नद्यांना कुठे ठाऊक होता स्वतःचा ऍड्रेस 
प्रति :समुद्र एव्हढाच मजकूर घेऊन त्यांचे पोस्टमन  उधळले 

मी रोज पुस्तकासारखी दलदल वाचतो 
लोकांना का माझ्यात कमळ दिसू लागले 

पृथ्वीला तहान होती कि ही माणसाची कल्पना होती 
हे मात्र खरे कि पंचांग पाहिल्यासारखे पाऊस पडले 



श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )


मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक

काहीही भंपकपणा चाललेला असतो
खरंतर माणूस आतून हललेला असतो

शहाणपण शिकवायला काय लागते
मूर्खपणा आतून बाणवलेला असतो

सल्लामसलतींचे हजारो प्रकार
देणाराही आतून ताणलेला असतो

रतीब चालू असतो माझ्या घरी पुस्तकांचा
माझा अडाणीपणा त्यात खणलेला असतो

चालू द्या तुमचे म्हणत  निघून येतो माझ्याकडे
माझी वाट बघत मी  थांबलेला असतो

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

जग बदलणार नाही हे स्वीकारू शकता
किंवा जगाच्या बाहेर तुम्ही जाऊ शकता

तृष्णा कायमच व्यवस्थेची गांड मारणार
तुम्ही फक्त हातांनी तिची  गांड धुऊ शकता

माणसे इथे फक्त कपडे बदलत असतात
अंघोळीला नवे नवे साबण पुरवू शकता

क्रांती वैग्रे फक्त कल्पनेतच घडतात
प्रत्यक्षात वास्तवाला तुम्ही थोडी चावी देऊ शकता

करा प्रयत्न प्रयत्नाला माझी ना नाही
आम्ही प्रयत्न केला एव्हढेच फक्त सांगू शकता

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

'तेरी अँबिशनने मुझे धोखा दे दिया 
ज़िन्दगीने अजमानेका मौका दे दिया 

गरिबी हो या अमीरी मरना तो  हैं ही 
गम  हैं की जीते जी तूने मरना दे दिया 

तेरा चेहरा घना सोफा अंधेरेका 
तूने सूरजको कहाँ छुपा दे दिया 

तू नेता हैं तुझे खिलवाड़ करनेका हक़ हैं 
हमने माना क्यूंकि तूने  समझा दे दिया 

आ फिरसे मार अगली इलेक्शन तक 
हमने तो पाँच सालकेलिए सब खुला दे दिया 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल 

प्रेमामध्ये तूच सांग काय नेमके तुला पाहिजे 
जगाची हवा पाहिजे कि श्वास हक्काचा पाहिजे  

भाषांना सवयी आहेत प्रेमांना लकबी आहेत 
चल ह्यांच्याबाहेर जाऊ नवी परिभाषा पाहिजे 

मी  म्हणजे जनावर वायरी वायरीत फसलेले 
वीज बंद करणारा  तुझा हात हलका  पाहिजे 

शेपूट नाहीतरी का माकडासारखा नाचतोय 
माणसाला  आता कोणता नवा चेहरा पाहिजे 

कानांना  ह्या जगात  स्वतःच्या आत ह्या युगात
परमेश्वर  ऐकण्यासाठी किमान शांतता पाहिजे


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

शेवटी वाळवंटात गेली 
नदी तहानेने मेली  

शेवटी प्रेमस्वरूप कळाले 
ते निघाले जेली 

चहाबरोबर  पाव खाल्ला 
प्रकाशाचा  डेली 

हा काळच चोर होता त्याने 
प्रार्थना चोरून न्हेली 

मला टॉवेलमध्ये गुंडाळले 
आणि ती न्हाणीघरात गेली 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )


मुक्त गझल 

एकतर भाषेत स्वतःला फाशी द्या 
किंवा कविता न लिहिता आपोआप मरा 

कवितेशिवाय भाषेशिवाय गरिबांना आधार कुठे आहे 
बाकी श्रीमंतांची माध्यमे गरिबांनो भाषेत या कविता लिहा आणि कवितेत जगा 

मी तुझ्या केसांपेक्षा अधिक काळा आहे मी रात्र आहे 
माझ्याशी लग्न करशील तर होईल तोंड काळे देह काळा 

तुझ्या गोऱ्या रंगाला सूर्य अवगत नाही म्हणून तू गोरी 
माझ्या काळ्या रंगाला माहित सूर्य कसा साठवायचा आणि बनवायचा काळा 

तू मोजत बस तुझ्या खिडकीतून दिसणारे शुक्ल शुभ्र  चंद्र 
मी शोधत राहीन माझ्या आतील कृष्ण विवरांची गहनता 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

माझ्या किनाऱ्यावरून तुझ्या किनाऱ्यावर आभाळ फेकले 
रात्री तुकडे झाले तेव्हा कळाले मी चुकून वेताळ फेकले 

कुठलाच सूर्य आता माझ्या शरीराचा पाठलाग करत नाही 
माझा गुन्हा हाच कि मी त्याच्या शरीराचे कॅलेंडर बनवून त्याच्या पायात काळ  फेकले 

वेड लागलेले हृदय होते तू म्हणालीस  ते जिवंत नाही 
रक्तानेही नाचून नाचून शेवटी कंटाळून चाळ फेकले 

किती लाइफलाईन्स शोधू दरवेळी हात नवा होतो 
जेव्हापासून माझ्यासमोर तू रेंदाळकरांचे माळ फेकले 

प्रेमावर विश्वास ठेवून तुझ्या दिशेने चालत राहिलो 
आणि तूही परीक्षा घेणारा माझ्यासाठी तुकयाचे टाळ फेकले 




श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

सर्वच ठिकाणी माणसे 
लादलेली आणीबाणी माणसे 

गाढवे निवडणुकीत उभी 
त्यांची निशाणी माणसे 

जरी स्वर्गाला लोम्बकळती 
नरकाच्या खाणी माणसे 

जपत नाहीत माणसांना 
जपतात रुपयेनाणी माणसे 

पृथ्वीलाही कळली नाही 
अनाकलनीय कहाणी माणसे 

बाकी मेले तरी चालेल 
गातात माणसांची गाणी माणसे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

किती आहे भाषे सांग तुझी औकात 
मी तुझे शरीर आहे तू माझी कात 

वाटेल तशी वाटेल तिथे घासली जातेस 
ज्यांना काही अक्कल नाही असेही तुला फिरवतात 

अर्थाचा नाश करण्यास जो तो टपलेला 
आपल्याच बापाचा माल समजून तुला वापरतात 

अचूकतेचे भान नाही सगळा कारभार ढोबळ 
स्वतःच्या फिटिंगप्रमाणे तुझे शरीर शिवतात 

तुझ्यातच पडतात अडकून जणू तू कमळ 
तुझ्यातच जन्मतात तुझ्यातच मरतात 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
कोळीण मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

खून करणारी नजर 
खोल पाहतिये कि वरवर 

न्याहाळतोय मीही ती  
उभी जसा शिल्पापूर्वीचा पत्थर 

आब असा कि समुद्र गिळणारंय 
अंगावर सूर्याची  सोनेरी झरझर 

स्वतःहून आले कि हिने फासले 
मासे जे पसरलेत तिच्या टोपलीभर 

थोड्या वेळाने अंधार होईल 
मीही निघेन घेऊन चंद्र पाठीवर 



श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

तुमचा संकुचित सुभा आहे 
मी कास्टलेस अनंत उभा आहे 

मी तुम्हाला परवडणार नाही 
माझा समुद्र महागडा आहे 

परंपरेचे वाजवा टाळ 
मी साक्षात नवता आहे 

मला गुंडाळता येत नाही 
हा तुमचा प्रॉब्लेम जुना आहे 

उपेक्षेने काय फरक पडणार 
मी जाणतो मी नव्या युगाची अपेक्षा आहे 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल 
प्रकाशाने प्रकाशाला पहावे कसे 
सुगंधाने तुझ्या देहात नहावे कसे 

सूक्ष्म हिरे लावण्याचे पेशोपेशी 
डोळ्यांनी स्थूल त्यांना निरखावे कसे 

सिग्नल पाहिल्यासारखे सर्व स्तब्ध 
जाणाऱ्यांनी तुला टाळून जावे कसे 

कुठल्या तरंगांचा तू उगम आहेस 
जो तुझ्यावर मरतो त्याने शोधावे कसे 

तू फक्त कल्पना करावी किती मेले 
उरलेल्यांना विवंचना जगावे कसे 





श्रीधर तिळवे नाईक 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल 
अर्थापलिकडे किंवा मिनिंगलेसच राहणार 
हे असणे जसे आहे तसेच राहणार 

तुझ्याआधीही हे उपस्थित होते 
तुझ्यानंतरही हे इथे असेच राहणार 

अपघात असो अथवा असो काही योजना 
आयुष्यात फरक न पडता  कसेबसेच राहणार 

विज्ञानाच्या वेताळाची उडाली शकले 
विज्ञानाचेही क्षण भंगुर ठसेच राहणार 

मोक्ष मिळवणारे मरून जाणार  मोक्षात  
त्यांचेही शेवटी किस्सेच राहणार 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )


मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक
अनिश्चिततेला फीट  आहे 
मी धुक्यात आहे पण नीट आहे 

शब्दांची श्रीमंती बस दाखवते 
शोधायची तुझी तुला सीट आहे 

समुद्राएव्हढे अनंत प्रवाह 
आणि उभे रहायला वीट आहे 

इंद्रिये पाण्याची बनलेली 
 बोट मेंदूची  तीट आहे 

शेणात पडलायस ? तूच ठरव  जग 
बुल आहे कि बुलशीट आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

चिमणीच्या हृदयात घड्याळ 
चोचीत अळ्या आणि माळ 

हवा  मुळादरम्यान फांद्या 
फुले बनलेली तुकोबांचे टाळ 

झाडांचा कबुलीजवाब 
ऐकणारा एकटा माळ 

फ्युज झालेले वास उडाले 
कन्फ्युज झालेले टिकले चाळ 

निसर्गाची बार्टर सिस्टीम 
मी तुला  तू मला माळ 

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल
कुत्रे कि माणूस कोण स्टेकला 
ठरेपर्यंत मी जाऊन येतो स्टेटला 

सिलिकॉन जाण्याचा आडवांटेज 
बाकी सर्व विसरु इथेच  डेकला 

काळजाचा दगड वाया जाईल 
प्रेमात नाहीतर असतेच काय स्टेकला 

सायलेन्समध्ये जास्त चांगला नाचतो 
आय डोन्ट नो काय बीटमध्ये  होते त्याच्या डाव्या लेगला 

वाऱ्याचे सारे बोल्ट तुटले 
वादळे  विकू जेव्हा परतू  कोल्हापूरला 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल मिलिटरी पार्टी श्रीधर तिळवे नाईक 

मेसेज डिकोड केला कि भांडणे होतील 
आणि सिक्रेट ठेवलास तर जीव जातील 

शिव्या जास्त देतो म्हणजे पराभव लक्ष्यात आहेत 
तुही शिव्या देशील तर युद्धे ताजी होतील 

रात्र सूर्याने तयार केलेले मद्य आहे 
नशा ताणवशील तर चकना  म्हणून चंद्र येतील 

पृथ्वीने श्वास रोखून धरलाय म्हणजे ती येईल 
थोड्याच वेळात ह्या इक्विलिब्रियममध्ये चमत्कार गजबजतील 

तिने सोडलेल्या जागांचेही हिरे झाले 
ती जिथे बसली होती तिथे उद्या ताजमहाल उगवतील 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 
मी माणसांच्यावर प्रेम करतो मानवतेचं माहित नाही 
मला हाडामासांचं गणित कळतं आत्मिक बित्मिक  माहित नाही 

त्याची नजर टॉर्चरसारखी मी त्याला दिसतोय हे माझं दुःख 
माझ्या टप्प्यात टीव्ही स्क्रीन त्याच्या टप्प्याचं माहित नाही 

गळ्यामधली आवाज- झाडे वाढतांना रोज दिसतात 
रोज उमलतात नवी फुले गंध कुठे जातात  माहित नाही 

ह्या  खोट्यांचा  ना मी  मालक  तरीही माझी ती सेवा करतात 
कोठून त्यांना एंट्री मिळते कोठून एजझिट माहित नाही 

फुग्यांवर फुगे रचून त्यांनी म्हणे एव्हरेस्ट पादांक्रात केले 
माझ्या काळजावरचा दगड कसा हटवावा माहित  नाही 



श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

नव्या युगाचा मी संत आहे 
माझ्या पोटात जंत आहे 

जीभ विषात भिजलेली 
भाषेमुळे जिवंत आहे 

भूक नि  मी म्हिठीमध्ये 
पेनकिलर महंत आहे 

झोप गुन्हा केल्यासारखी 
जागृतीकथा दंत आहे 

तुला जावया रस्ता कुठाय 
उखडलेला आसमंत आहे

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

आयुष्य ऍक्च्युअली कलेक्टेड आहे 
कविता दाखवते ते सिलेक्टेड आहे 

दगड समजून त्यांनी काळीजं तोडली 
मेंदू बांधकामाशी कनेक्टेड आहे 

तू हाकललेल्या जागी आलायस 
नकोसा फिलिंग अटेस्टेड आहे 

मोडलेलं मला जाणवत राहतं 
खायाला उठतं ते फ्रस्टेटेड आहे 

मी नग्नता स्कॅन केली 
स्पर्शातच काहीतरी फॅब्रिकेटेड आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

तुझा का आयुष्यावर जीव जडला 
बघतो तेव्हा पृथ्वीवर सापडला 

मी मृत्यूची रिहर्सल केली 
मेलो तेव्हा अभिनय कमी पडला 

मी गाईन म्हणून ते सूर्यात बसले 
माझ्या गळ्यात ऐनवेळी उन्हाळा वाढला 

बर्फ होण्यात शुभ्रतेची जादू असते 
मी थंडीत अवघा जन्म काढला 

कावळ्यांना हिरवी पालवी फुटली 
वसंताने पोपटांतून पसारा धाडला 

ती दुसरी पृथ्वी होती जिथून आलो 
ही वेगळीच इथे जीव तड्फड्ला 

आयुष्यभर  मृत्यूची रिहर्सल केली 
मेलो तेव्हा अभिनय कमी पडला

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

डोळ्यांवर खटले दाखल करूया का ?
स्वप्नांमध्ये जाऊन कायमचे मरूया का ?

एकमेकांना  ह्यापुढे काही द्यायचे नाही 
स्पर्श करता असा निश्चय करूया का ?

मी श्वासोश्वास करतो तुझा वास घ्याया 
हा वाराच आख्खा हातात धरूया का ?

आगी ऐकणारे कानच शिल्लक नाहीत 
ही राख रांगोळी  डोळ्यात भरूया का ?

नद्यांच्याकडे कुठे गलबला शिल्लक आहे 
पाणी बनून आता आपणच वावरूया का ?

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

मी माझाच जन्म झालो 
अन कॉन्ट्राडिक्शनमध्ये मेलो 

अलिएन्समध्ये उठबस केली 
रोबोमध्ये झोपी गेलो 

स्पेसशिप रांगू लागली 
नि मी प्रवासाला निघालो 

तरंगांनी रंग फिरवले 
मी कणांचा  खवा झालो 

तिथे मेलो इथे जगलो 
इथे जगलो तिथे मेलो 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 
मोजलेले ओझे टोचत नाही 
न मोजलेले पेलत नाही 

आगीही वजनदार झाल्या 
आणि  पाणी झेपत नाही 

खांद्यावर धूळ जमा झाली 
मेंदूत काय कळत नाही 

मी वाऱ्याची बडबड आहे 
जी वादळांना परवडत नाही 

ताऱ्यांनी प्रकाश हाकलले 
दुर्बिणींना हे दृश्य दिसत नाही 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )


मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

आयुष्य डॉटबॉलसारखे आले 
आणि शेवटी शून्य जमा झाले 

तिच्या फ्रेममधून फुले उमलली 
माझ्या फ्रेममधून दगड उडाले 

बांधणारे बांधतच राहिले इमारती 
राहणारेही घरी फक्त  रहायला आले 

स्वप्नांनी स्वप्नांच्या पिपाण्या  वाजवल्या 
वास्तवाने स्वरांचे गाजर मोडून खाल्ले

माईक हाती येताच तो सत्ताधारी झाला 
ऐकणारे सत्ताहीन  ऐकणारे झाले  


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

तुझा दुकानात येण्याचा बहाणा समजतो 
तू दाखवतेस मेंदी त्यातील उखाणा समजतो 

त्याच्या डोळ्यात वेडाचे इस्पितळ स्थिर 
जो स्वतःला जगातला सर्वात शहाणा समजतो 

तुझ्या माझ्या नात्यातला गोडवा दुर्बोध
तू देतेस चुंबन मी साखरेचा दाणा समजतो 

शब्दाशिवायची हवा तुझ्या नजरेतून येते 
मी साऱ्या वादळांना भाषेचा ताणाबाणा समजतो 

जो तो आपल्या प्रेमाला  दाखवतो बधिरता 
आपण मात्र हळवेपणाला नजराणा  समजतो 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )


मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

ही पृथ्वी दुसरी आहे मी पाहिली ती वेगळी होती 
ही तर तुकडे झालेली मी जगलो ती सगळी होती 

तुझ्याकडून न  काहीच मागणे मी आता शिकलो आहे 
तुझा  हात अख्खा गुलाब मी पाहिली ती पाकळी होती 

जंगल केवळ जंगल नसते ती पृथ्वीची मेमरी असते 
ही तर जीर्ण शीर्ण झाली मी पाहिली ती कोवळी होती 

ज्याने  अख्खे रक्त वल्हवले तिला  काळीज वाहण्यासाठी 
 त्यास म्हणे , "तू अस्सल होतास पण शैली तुझी गोंधळी होती  "

झाड कापण्या  कुऱ्हाड टाळून कटर मशीन घेऊन आले 
म्हणे दांडे मिळाले  नाहीत अन लाकडे फार कोवळी होती 

झाडे हीही संगणक असतात आणि त्यांचे प्रोग्राम असतात 
तुमची शैली मृतप्राय आहे त्यांची शैली चळवळी होती 

झाडांविषयी समजायला तुम्ही कुठे झाडे आहात 
तुम्ही एक श्रद्धांजली लिहाल म्हणाल अटळ बळी होती 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

हे भय कुठूनही श्वास घेते 
माझा बरोबर वास घेते 

कुठेही गेलो तरी टळेना 
माझी  मुलाखात हमखास घेते 

अंगावरून  वारा जातो 
त्वचेखालून अदमास घेते 

जखमांखाली रक्त लपलेले 
बाहेर येण्याचा ध्यास घेते 

आवाजात रिकामेपणा 
गाणे ऐनवेळी वनवास घेते 

भयाला भाव देतो कारण 
ते मोक्षाचा तास घेते  

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

एकेक प्रेत खिळे  बनले 
ठोकणारे खुळखुळे  बनले 

अख्खा इतिहास बॅनर बनला 
महापुरुष पुतळे बनले 

कवट्यांचे पुरावे झाले \
मृतप्राय जुळे बनले 

झोपेतही माउस दिसतात 
मांजर दुधखुळे बनले 

मी भुकेकडे वळलो 
अन्न लगेच शिळे बनले 



श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

आता वाऱ्याने यावे उध्वस्त करावे निघून गेली ती 
किंवा तिला गाठावे इथे आणावे निघून गेली ती 

ढगांनी उतरावे रस्त्यावरती रस्ता ज्याम करावा 
किंवा आठवणीत माझ्या भिजवावे निघून गेली ती 

आली आयुष्यभरासाठी गेली दोन दिवसात ती 
काळाने माझे तिला बिंब दाखवावे निघून गेली ती 

चालताना तिला माझी आठवण येत असेल का 
असेल तर तिने कायम सोबत चालावे निघून गेली ती 

माझ्यासारख्या कठोराला तिने शिकवले फुले झेलण्या 
तिच्याविना  मी कसे   बाग माळावे निघून गेली ती 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

ऐनवेळी  हातात आले पण पॅराशूट   पडले नाही 
हे खरे  हवेतल्या हवेत आयुष्य माझे सडले नाही 

प्रयत्न केला पाहण्याचा बर्फाखालील  चेहरा  मी 
पण बहुदा पाणीच मला पाहण्यासाठी  धडपडले नाही 

झोपण्याआधी किस घेतला अन तिच्या ओठात झोपलो 
जाग आली तेव्हा काहीच तिचे मला सापडले नाही 

कितीही मी केले तरी तुला काही फील होत नाही 
रुक्ष येतेस कोरडी जातेस जणू ओले काही घडले नाही 

एकमेकाला दगड समजून दगडामधली फुले हुंगली 
आत कशाच्या बागा होत्या का वादळ धडधडले  नाही 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

श्वास असा होता कि वादळ पॅरलाईझ झाले 
त्यात तिचा गंध होता शेवटी अनॅलाईझ झाले 

ईश्वर तर  आपल्या तब्येतीत मस्त आहे 
माणसांना झेपत नाही हे रिकग्नाईझ झाले 

फुलाफुलांमधून  एक्स्पोज झाला वसंत 
माणसांना झाड तेव्हा रिअलाईझ झाले 

किंचाळ्यांचे तिच्या मी बनवले संगीत
ती जाताच  माघारी त्याचे नॉईझ झाले 

तिच्या पाठीमध्ये पर्वत दोन हलायचे 
नदी उतरायची तिथे सनराईज झाले 

माझ्यासारखी हुबेहूब तू बनू लागलीयेस 
हे कसले प्रेम हे तर काम्प्रोमाइझ झाले 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

रक्त वाहते आहे कि प्रेम वाहते आहे 
काळीज दोघांपैकी कुणास पाहते आहे 

तारा प्रश्नांच्या मेंदूत जुळवून ठेव 
उत्तर वाट बघत तिथेच राहते आहे 

युद्ध संयमी आहे संधीची वाट पाहते 
शांतता सहनशील नाही उतावळी दाहते आहे 

आसक्त न होता मी तरंगतो  आहे 
अस्तित्व तात्पुरते  असण्यात न्हाहते आहे 

न तुझ्या प्रश्नास मी आवाजास कंटाळलोय 
काहीतरी धूर्त  त्यात वाहते आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

मांसा हवेत नाही पाण्यात आहे 
कसा टिपशील तो गाण्यात आहे 

रहस्य गरम झाले तिच्या वागण्याचे 
तुझे शहाणपण थंड जाण्यात आहे 

स्फोट झाले काल सामान  घेतांना 
प्रेम  वाचले ते आजच्या खाण्यात आहे 

कुठे कुठे आंधळे  स्पर्श केले तिला 
तपशील कैद त्वचेच्या ठाण्यात आहे 

तिने कुशल बोटांनी काळ कापला 
त्याची स्लाइस प्राचीन नाण्यात आहे 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

एक श्वास हवेमध्ये जो घेतला नाही 
एक पाठलाग तुझ्या इथे जो  टेकला नाही 

चार भिंती  ज्या साक्षी  होत्या  बंडाच्या  
एक दरवाजा  कधीही जो  झुकला  नाही 

एक रस्ता आंधळा होता पण चालतां 
एक प्रवासी जो चालतांना थकला नाही 

एक भाषा जीभेत  जी होती तोतरी 
एक शब्द बाजारात जो टिकला नाही 

एक प्रेम ज्याचे ओझे पाठीवरती 
एक देह वजनाने जो वाकला  नाही 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )


मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

प्रतिमेमध्ये फिकट होत चाललेले प्रेम 
दिवसेंदिवस बिकट होत चाललेले प्रेम 

आश्चर्यमुग्ध  नवेनवे   हावभाव तिचे 
आणि माझे सरसकट  होत चाललेले प्रेम 

बर्फ करतो आहे मेहनत पाणी बनण्यास 
त्याच्या आत चिकट  होत चाललेले प्रेम 

आवाज माझा दगडफेकीत सामील होत 
आणि गळ्यात तिखट होत चाललेले प्रेम 

फळ खाणे  सुद्धा वाटते क्राईमसारखे 
समोर भुकेचे विकट होत चाललेले प्रेम 

वॉर्निंग देऊन माझा खून करते हसते 
माझे तिच्या निकट होत चाललेले प्रेम 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

डोळे जिथे गेले तिथे कुणीच न्हवते 
प्रेम जिथे मेले तिथे कुणीच न्हवते 

तिने माझ्या प्रेमात शीरा कापलेल्या 
जिथे हे केले तिथे कुणीच न्हवते 

पृथ्वीला पूर आला काळजापर्यंत 
जग जिथे मेले तिथे कुणीच न्हवते 

ईश्वराची चौकशी  झाली  प्रकरणात  
चौकशीस  न्हेले तिथे कुणीच न्हवते 

मी निर्दोष  सुटलो समाजाने पाहीले
माझे काळीज मेले तिथे कुणीच न्हवते 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

आपण सर्व हाकललेले आहोत 
ह्या पृथ्वीवर हरवलेले आहोत 

आपल्या वाट्यास कालखंड 
कालखंडात फिरवलेले आहोत 

इथेही नरकच बनवतो आहोत 
स्वर्गातून कोसळलेले  आहोत 

आपण बुद्धापेक्षा महान 
शंभर बुद्ध पचवलेले आहोत 

आपण स्वतःला गिफ्ट समजतो 
पार्सल म्हणून पाठवलेले आहोत 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )


मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

न वाजणारे ढोल फाडा 
जो व्हायचाय होऊ दे राडा 

डोळा पुरेसा भाजलेला नाही 
आगीने का केला खाडा 

प्रत्येक क्षणावर नवा व्रण 
काळ जखम बरी करून धाडा 

शहर असेल हवे नवे तर  
राजवाडा प्रथम पाडा 

आयुष्य घोस्ट रायटरचे  
स्क्रिप्ट  वाचा वा गाडा 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

पुन्हापुन्हा परंपरा  हातावरती  खाजेल
पडलास जर बळी तर बॅण्डबाजा वाजवेल 

बसवण्णा सांगून गेले कित्येक शतकापूर्वी 
उभे राहील ते सडेल चालत राहील ते जगेल 

तू जीवन्त रसरशीत हाच खरा चमत्कार 
बाकी सारे चमत्कार खोटे आणि बनेल 

शांतता वसंतासारखी आवाज न करता येईल  
युद्ध मात्र शिशिरासारखे पाचोळा वाजवेल 

तुझा बनण्यासाठीच मी शहरात श्वास घेतो 
नाहीतर कोल्हापुरात काय आहे जे टिकवेल 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

स्वतःचे प्रेत खांद्यावरती टाकण्याची सवय होईल 
डोक्याची शंभर शकले करण्याची सवय होईल 

डोळ्यांसारखा हमाल नाही प्रत्येक क्षणी नवे ओझे 
जे जुने ते नजरेआड करण्याची सवय होईल 

छातीमध्ये प्रत्येकाच्या काळजाजागी दगड आहे 
तुलाही हळूहळू मेड्युसा बनण्याची सवय होईल 

घाबरू नकोस ऑफिसमध्ये स्वतःची राख बघून 
घरी जाताच पुन्हा शरीर मिळवण्याची सवय होईल 

हिंदू असशील राख  ऐकशील ज्युडाइक  माती ऐकशील 
हळूहळू तुलाही गुणगुणण्याची सवय होईल 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

कर्कश असेल पण आवाज तरी आहे 
खारट असेल पण गाज तरी आहे 

शब्द सापडत नाहीत अशी ही दुःखे 
डोक्यावर त्यांच्या ताज तरी आहे 

तिने खिळे म्हणून नखे ठोकली 
प्रेम नाही पण खाज तरी आहे 

भले काँक्रीट नसेल तरंगता असेल  
माझ्याकडे माझा आज तरी आहे 

भले  नसेल केले क्रांतिकारी बंड 
तो सिस्टीमवर नाराज तरी आहे 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

धुक्याने सारी चाके बनलेली 
तिची अदाकारी फटाके बनलेली 

वेड्यांच्याच डोळ्यात आनंद 
तिच्या वासाची नाके बनलेली

शब्द शोधत गेला तिच्या घरी 
कविता माझी फाके बनलेली 

मी तिला नव्याने वर्गात न्हेले  
जुन्या नकाराची बाके बनलेली 

हा किती तिचा उपकार झाला 
जखमांवर ती टाके बनलेली 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

श्रद्धा ठेवणं फिक्स झालंय 
संशय घेणं रिस्क झालंय 

सडणे वास डोकेदुखी 
नाक  अवघे व्हिक्स झालंय 

धर्म आधीच शंकास्पद  
विज्ञानही  डिस्क झालंय 

 न प्युर  बनू देते असं 
जनुकांत काही मिक्स झालंय 

चंद्राचा यानाने अंत केला 
प्रेमही गिमिक्स झालंय 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

सिमेंटची धूळ गावात उडायला लागली आहे 
माती दोन्ही डोळ्यांना खुपायला लागली आहे 

मातीतून उगवते त्याला काहीच मोल नाही 
सिमेंट-फॅक्ट्री अनमोल आभाळायला  लागली आहे 

जो तो पाडतो आहे बापज्याद्यांची घरे 
प्रत्येकास  पुढची पिढी दिसायला लागली आहे 

जो तो गावामधून निसटण्याच्या बेतात 
स्वप्नेशी शहरामध्ये जगायला लागली आहेत 

जो तो जगण्यामधून  आत्महत्येकडे 
तिचीही  वेळ शहरात ठरायला लागली आहे 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 


आनंदाने डोळे धुऊन निघाले 
तुझ्या डोळ्यात प्रेम पाहून निघाले 

भुतांनीं लिहलेली गाणी नष्ट झाली 
मानवी शब्द देवास कवटाळून निघाले 

जो तो उडवतोय माझी चेष्टा 
शंभर चेहरे माझे हसून  निघाले 

एक पोरगी पटणे चंद्र तळहातावर 
सुरे माझे गांधींना हार घालून निघाले 

जणू बाग झाली झोपडपट्टीची
गजरेही गंधट्रॅकींग करून निघाले 

न्यू कॉलेज पुन्हा नव्याने झाले न्यू 
जुने सर्व चाटून पुसून निघाले 

काटे तुडवत आल्यासारखे जे येत 
बाभळी दोस्तही फुलांतून  निघाले 

रंकाळ्याचा  नव्याने शोध लागला 
कीसमधून  पाणी घुसळून निघाले 

तुला द्यायचे ते आवरून ठेवतो 
स्फोट रक्तातले घुसमटून  निघाले 

एरव्ही हातांनी ज्यांना कापले असते 
त्यांना फळे कापून देऊन निघाले  
  
कोल्हापुरात तुझ्या माझ्या चर्चा 
शहर का प्रेमाने ढवळून निघाले 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

दुकान आहे म्हणून मी आहे 
बाकी जो आहे तो डमी आहे 

निघतील असे कपडे घालून जातो 
तिच्याही अंगात गरमी आहे 

टेबलावरील फुरफुरतात डॉल्स 
मला पाहून येणारी गुरमी आहे 

नागड्याने  एकमेकासमोर  
जेवणात मिठाची कमी  आहे 

वादळात रोज  घालतो घोडे 
न माहित कसली खुमखुमी आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

चित्र म्हणून अंधार टांगला आहे 
अन पेंटर म्हणतो तो चांगला आहे 

तलवारीची श्रीला न दाखव भीती 
लहानपणी त्यावर रांगला आहे 

रणगाड्यासारखा चेहरा घुसला 
माहित नाही मराठी कि बांगला आहे 

हे भांडे का आहे योनीसारखे 
कि इथेही पुरुष पांगला आहे 

चेहऱ्याचा केऑस कि केऑसचा चेहरा 
कोणता कोलाहल  चांगला आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

किसचा शॉट तिने चांगला दिला 
ह्या निमित्ताने पुरुष पिला 

तळव्यावर मेंदीने मला काढले 
तिथेही मी ढिलाच्या ढिला 

फोटोतला बल्ब विझलेला 
हीही म्हणे प्रभूची लिला 

आता काय मी शव कातरावे 
भेट म्हणून तिने अडकित्ता दिला 

अर्धी दाढी केली प्रायोगिक म्हणून 
तिनेही  नसलेल्या मिश्यांवर ताव दिला 



श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

प्रत्येक फोटोत तो विचारी दिसला 
समोर पाहिले तर तिच्या दारी दिसला 

सगळेच  कसे ठोकले गेलेले 
आणि ठोकणाराही भिकारी दिसला 

गणितही थोडे अविचारी झाले 
भूमितीला नवरा पगारी दिसला 

पाण्यात उडी मारली आरसा निघाला 
डोळा थोडासा व्यभिचारी दिसला 

बाजारात लोकप्रियता वाढलेली 
त्याची जो आयटेम संसारी दिसला  


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

तो सांगाड्याशी बोलतो आहे 
नि सांगाडा शर्ट खोलतो आहे 

सोंगाड्या शिवसैनिक झाला 
वाघालाही तोलतो आहे 

क्रांती शेवटी सर्वत्र पोहचली 
तिकिटात माओ डोलतो आहे 

कोण कम्फर्टेबल जगण्यात 
स्वतःचे मरण सोलतो आहे 

जेव्हापासून तिने भाव विचारला 
मी बाजारात अनमोलतो आहे 



श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

तो खोट्याप्रमाणे दिसू लागलाय 
शेवटी खऱ्यात फसू लागलाय 

भुकेमुळे सूर्यापर्यंत चालत गेलो 
मला पाहून सूर्य धसू लागलाय 

सिनरी पाहून कसा तृप्त होईन 
देह देहासाठी फसफसू लागलाय 

काळीज ब्रेकनंतर काळे झाले  
काळा  प्रत्येकावर  वसवसू लागलाय 

मी मेलो आणि हिवाळा झाला 
शहरात सर्वांना बर्फ डसू लागलाय 




श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

हिवाळा गेला तरी थंडी आहे 
काळजावर स्वेटर अन बंडी आहे 

तहान गळ्याच्या  जवळच आहे 
बर्फ मात्र अजून घमंडी आहे 

निघताना काही पुस्तके सोडली 
धुक्यात हीच एक दवंडी आहे 

शेवटी हा रस्ताही रस्त्याला मिळेल 
ज्या रस्त्यावर उभी मंडी आहे 

जे नाहीसे झाले त्यांच्या खाणाखुणा 
इथली मुख्य देवी चंडी आहे 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )
मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

मी जिवंत असलो काय मेलेलो असलो काय काय फरक पडतो 
स्वप्नात असलो काय किंवा  सत्यात बसलो काय काय फरक पडतो 

कुणाला काळजी इथे माझ्या अस्तित्वाची कुणाला आहे चिंता 
नाराज झालो काय किंवा कुणावर रुसलो काय काय फरक पडतो 

सत्य शोधण्याकरता अंतिम  जगत गेलो इथे मी अफवेसारखा 
आयुष्याच्या बाटलीत सोड्यासम फ़सफ़सलो काय काय फरक पडतो 

मोक्ष मिळाला तरच तुमच्या अध्यात्माला समाज देतो किंमत 
नाही मिळाला वाया जाऊन हिरमुसलो  काय काय फरक पडतो 

लोक चढवत नाहीत तुम्हाला सुळावरती तुम्ही सूळ घेऊन चालता  
देवापर्यंत पोहचलो  वा सैतानात घुसलो   काय काय फरक पडतो 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

मी संन्यासी असलो तरी अद्ययावत आहे 
तुमच्याच डोक्यात परंपरेचे जुने व्रत आहे 

भगवा नेसून कोणी मागास बनत नसतो 
भगवा तो जो आगीने जुने जाळत आहे 

कर्मकांडांना मी मारतो फाट्यावर 
जे जे जीर्ण ते ते आपोआप फाटत आहे 

तुमच्या डोळ्यांवरचे चष्मे आधी हटवा 
मग सांगेन कोणते ट्रेंडी गॉगल प्रचलित आहे 

जाणतो तुमच्या डोक्याचा माझ्यामुळे भुगा होतो 
मी लाकूडच असे जे जंगल बनवत आहे 

हे इतके सोपे नसते मोक्षाचा पाठलाग करणे 
ज्याला नव्या गाड्या कळतात तोच पोहचत आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

वर्ण जातीच्या साहाय्याने तुम्ही कॉर्नर करत आहात 
मी सापडेन ? तुम्ही भ्रमात वावरत आहात 

जो अनंताच्या मागे त्याच्या मागे फुटपट्टी घेऊन ?
धावा ! स्वतःचीच दमछाक करून फुटपट्टीत घोरत आहात 

आधी डबक्यातून बाहेर या मग समुद्राविषयी बोला 
बेडूक बनण्यातील सुरक्षितता फेका कशाला घाबरत आहात ?

एकदा जात कळली कि प्लेसमेंट चांगली जमते ?
ही असली प्लेसमेंट फाट्यावर मारतो बोला आता काय करत आहात ?

मला माझ्या अनंत शिवाची अनंत मान्यता हवी आहे 
आणि ती मान्यता मोक्ष आहे समजावूनही मूर्खपणा करत आहात 

वर्ण धर्म जातीत अडकणे म्हणजे मोक्षाला वंचित होणे 
इतकेही कळत नाही तर ते शिवलिंग का धरत आहात ?


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

मोक्ष तोच जो धर्माला रद्दीत जमा करतो 
स्पर्श अनंताचा व्हावा म्हणून धडपडतो 

मुक्ती तीच जी धर्मग्रंथांच्यापासून मिळते 
जिचा नग्न देह सर्व कपड्यांच्याबाहेर वावरतो 

निर्वाण तेच जे म्हणते ,"बुद्ध अडथळा असेल तर बुद्धालाही कापेन "
मार्ग तोच जो तुमच्या पायांनी चालून चालून बनतो 

कैवल्य तेच जे सगळ्या मळाला नाहीसे करते 
जीन तोच जो प्रवचनांच्याबाहेर शुद्ध धगीत तेवतो 

आधी धर्म गाडा त्याशिवाय रस्ता मोकळा होणार नाही 
साधक तोच जो सर्व धर्म फाट्यावरती मारतो 



श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

एकटा पडलेलो आणि एकांत आहे 
शब्द हा अज्ञाताचा आकांत आहे 

मित्र सारे टाकून गेले कुठे पुढे 
एका साध्या सोबतीची भ्रांत आहे 

वेदना स्वतःच्याच पहात बसणे 
आणि डोळ्यांना समजावणे मी  शांत आहे 

जखमा खोलून साऱ्या रक्तापुढे  मांडणे 
पाहणे हृदय खवळलेले कि निवांत आहे 

दरवाज्यावर अनंत काळ  वाट पाहणे 
आणि खिडकीला सांगणे हे सांत आहे 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

मेलेल्या लोकांना आदर देत रहा 
त्यांच्या प्रेतांमधून आजन्म सडत  वहा 

जे मेलेले असते तेच फक्त महान असते 
जे जिवंत ते चिल्लर दुर्लक्ष्य करत रहा

फुलझाडांवरची फुले नका पाहू 
जी दुकानांत लागलेत त्यांना हुंगत रहा 

पाणीही सडल्यानंतरच रहा पीत 
जे जिवन्त रसरशीत ते दुरून न्याहाळा पहा  

नासून गेलात तरी नासण्याला द्या पारितोषिके 
जो आजचा सुगंध आहे त्याला गटारात सोडत रहा 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मुक्त गझल श्रीधर तिळवे नाईक 

मत्सराची बाधा कविंना बाधणारी 
कवीही माणूस आहे हे दाखवणारी 

तू कशाला त्यांना  बनवतोस देव 
देवांचीच मूर्ती जिथे मातीने बनणारी 

तुझा हात तरी कुठे सुवर्णाचा 
तुझ्याही बोटांना हाडे चावणारी 

आकाश गप्पांसाठी चांगले आहे 
तिथेही पोकळी आहे घाबरवणारी 

सगळा खेळ आहे काही क्षणांचा 
मातीच प्रत्येकाचे प्रेत उचलणारी 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

उदास करणारे वातावरण दाटलेले सगळीकडे 
कळत नाही कोण धूर्त कोण सरळ भाबडे 

ज्याच्या त्याच्या डोळ्यामध्ये चालूगिरी लपलेली 
ज्याच्या त्याच्या डोळ्यापुढे ध्येय एक वाकडे 

नेता म्हणावा वाईट तर मतदार विकला गेलेला 
रोज तमाशा लोकशाहीचा सदनात झिंगून पडे 

काय आहे आत असे कि झाले आहे जे करप्ट 
काय असे रोज मरते ज्याचे न येई कुणास रडे ?

मीच एक च्यू आहे काय उरला आहे जो देशात 
ज्याला देश बदलावासा वाटतो जो तडफडे धडफडे 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

चेहऱ्यावर फक्त जमतात चेहरे 
हळूहळू धूळ बनतात चेहरे 

करमणुकीसाठी दुसरे काय ?
चेहऱ्यात अखेर रमतात चेहरे 

एकमेकास अनोळखी होतात 
इतकी वर्षे काय बघतात चेहरे 

एकमेकाला बघून वा लढून 
एकमेकासारखे दिसतात चेहरे 

मुखवट्यांचीही गरज संपते 
मुखवट्यासारखे दिसू लागतात चेहरे 

एकमेकात इतके गुंतून जातात 
दुसऱ्याचे चेहरे जगतात चेहरे 

कसली वाळवी लागते चेहऱ्यांना 
काळात हळूहळू खंगतात चेहरे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )३७९


आळंदीला जाऊन काय करू 
मोक्षाचे पळून गेले कोकरू 

इंद्रायणीत फक्त पाणी उरले 
ती म्हणते तुझी घागर मोक्षाने कशी भरू 

विठ्ठल तर फक्त वारीपुरता उरला 
म्हणे मला कळत नाही पसारा कसा आवरू 

जात टाळता येत नाही आणि वैकुंठ हवे 
वारीत मानवतावादी घरी जातीतच लगीन करू 

श्रीधरला थेट मोक्ष हवा आहे 
तो विचारतोय दलालांना मी का पांघरू ?


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मी कळायला थोडा उशीर लागतो
थेट पाहिले तर सहज नाहीतर प्रयत्न पद्धतशीर लागतो

मी समुद्र आहे जो नद्यांना जन्म देतो
माझे मीठ दिसते ते बाजूला करायला धीर लागतो

लोकांच्या सांगण्यावरून मला जज नको करू
तुझ्याच अनुभवावरून ठरव त्यासाठी डोळा गंभीर लागतो

मित्रांनी केलेली बदनामी मी फाट्यावर मारतो
मला मारण्यासाठी त्यांना रोज नवा तीर लागतो

मी जगतो मनःपूत आणि जे काळजात आहे ते स्पष्ट सांगतो
मला दारू लागत नाही रात्री कबीर लागतो

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )


सगळीकडून संपलोय म्हणून काय झालं ?
आतल्या आत खपलोय म्हणून काय झालं ?

कोणीच उरले नाही माझे म्हणावे असे 
स्वतःस अंथरून झोपलोय म्हणून काय झालं  ?

आजारी पडलोय तरी कुणाचे लक्ष्य नाही 
जंतूंकडून जपलोय म्हणून काय झालं ?

उदासी अशी आहे कि बोलायची सोय नाही
मौनातच गपगपलोय म्हणून काय झालं ? 

कवितेच्या खुनासाठी आधीच अटक का ?
तिच्या जीवावर टपलोय म्हणून काय झालं 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मी स्वतःच एक आयडियालॉजी आहे 
जी नवी पण काळाच्या पुढली आहे 

अंधाराशिवाय त्यांच्याकडून काही मिळणार नाही 
पहाटही त्यांनी रात्रीत भिजवली आहे 

नव्या गायिका आल्या जुनी गाणी गात 
पुन्हा एकदा परंपरा हिट झाली आहे 

ती माझ्यापुढे जावी हीच इच्छा होती ना 
पुढे गेल्यावर का मग इच्छा अवघडली आहे ?

मी मुक्त गझलेत नवता नाचवतो आहे 
त्यांचा आरोप कि मी गझल बिघडवली आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मूड नसतांना मी गाऊ कशाला ?
जायचे नाही त्या रस्त्याने जाऊ कशाला ?

रोजच काहीतरी घडत असते 
रोजच्या रोज रिऍक्ट होऊ कशाला 

तुम्ही काहीही सांगाल मला 
मी करत नाही त्याचा बाऊ कशाला ?

मी काय तुम्हाला आज ओळखतो 
तुमच्या नादाने अंगणात विष लाऊ कशाला 

मीच जर  कुणाचा अधिकार मानत नाही 
मी कुणावर अधिकार दाऊ कशाला ?

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मोक्ष धर्माच्या तावडीत सापडला आहे 
हा पर्याय जनतेने निवडला आहे 

लोकांना कुठे मोक्ष हवा आहे 
त्यांना दिलासा हवा जो धर्माने धाडला आहे 

ह्यांची भक्ती म्हणजे केवळ संस्कार 
पिढ्यानपिढ्या चालताना जो गडबडला आहे 

कल्पनेतच जगला कल्पनेतच मेला 
आयुष्यभर कल्पनेतच तड्फडला आहे 

सत्याला आणि वास्तवाला जागाच देत नाहीत 
कल्पनांना माणूस इतका आवडला आहे 

ह्यांच्या नादाला लागून कल्पनेतच जगशील 
त्यालाच मोक्ष मिळाला जो माणसांच्यातून बाहेर पडला आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मिसळ 

ज्ञानापलीकडे जशी कोकिळा 
तशी माझी मिसळ तिचा लळा 

ठिकाणे  बदलतात ती  बदलत नाही 
झणझणीतपणाच्या  तेजस्वी  झळा 

चवीचा आत्मा ती रोज वाढवते  आहे 
काबीज करत सुटलीये जिभांचा  मळा 

मटकीचा ड्रेसकोड घालून ती हिंडते 
जिभेवर रॅम्पवॉक करतात कळा 


हवाहवासा तिचा लाल दहशतवाद 
नकोनकोसा तिचा विरह जांभळा 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मसाला डोसा 

सूर्य जणू थापला तव्याच्या कृष्ण विवरावर 
मग खायला दिला त्याचा वरचा थर 

वर्तुळाने बांधलेली  तांदळाची रेष 
बाहेरून सोनेरी आतून पांढऱ्या ढगाचा गर 

महाराष्ट्रात जरी  डोसा वाटतो उपरा  
वावरतो महाराष्ट्रात  जणू हेच त्याचे घर 

बटाट्याचे तुकडे भाजी म्हणून सेटल 
खाताना वाजू लागतात बीटल्सचे वावर 

खाल्ल्यानंतर सहसा कुणी भांडत नाही 
साऊथ इंडियन बनवतो बहुतेक खाल्ल्यावर 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून )

मी डोळा सादर केला इतरांचाही डोळाच पाहिला 
 नवा दाखवायचा होता प्रत्येकाने  जुनाच पाहिला 

तिची त्वचा सुंदर  पण स्फोटकांनी भरलेली 
प्रेम पाहण्याआधी मी प्रेमात खतराच पाहिला 

सरफेसमध्ये सारे काही देणाऱ्याने  पॅक केले 
भेट घेणाऱ्यांनीही  भेटीचा तोंडावळाच पाहिला 

साखळ्यांखेरीज काही तुम्हांस गमवायचे नाही 
ते म्हणाले आणि आम्ही उजाडलेला चेहराच पाहिला 

त्याला त्याच्या देशामधले सारे रस्ते माहीत होते 
प्रत्येक रस्त्यावर त्याला मी चहा घेतानाच पाहिला 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)


पुनर्जन्म ऍटोमिक रिऍक्टरमध्ये आहे 
कर्मफळ तुझ्या रिऍक्शनमध्ये आहे 

आत्मा मरेल शेवटी शरीराची माती उरेल 
तिचे मातीपण तिच्या रिबर्थमध्ये आहे 

भूकंपाने समुद्राचे पाणी हलवले 
जहाज अजूनही फिअरमध्ये आहे 

झाडे शेवटी लाकडामध्ये पोहचली 
माणूस वाढत्या पॉप्युलेशनमध्ये आहे 

आत अस जग किंवा बाहेर तू जग  अस 
शेवटी जगणे असणे  स्पेसमध्ये आहे 

तुला वाटते कि तू आरंभ अंत जाणतोस 
पण तुझे असणेही मध्ये मध्ये आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

अर्धा बुडलेलो अर्धा पोहतो आहे 
मी कोणत्या समुद्रात राहतो आहे 

कोणीही मूर्ख ह्या पाण्यात उतरतो 
पण टिकतो तोच जो वाहतो आहे 

नरभक्षक शार्क कि परमेश्वर 
सतत वाटते कोणी पाहतो आहे 

उपलब्ध आहे पण दंतकथा आहे 
नाईलाजाने  विश्वास ठेवतो आहे 

नकाशात आकसलेला देश माझा 
मी नकाशाबाहेर पडतो आहे 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)







प्रयोग म्हणून आणलेले तीनशे उंदीर
बघू किती करतात पार आता विहीर

तिला जरी होता हक्काचा नवरा
ईश्वरापासून झाला पुत्र काफीर

 मी तुझ्या बागेतले फळ नाही
जे सापाला बघून करेल किरकीर

यूरोपसुद्धा वाईट कविता लिहितो आहे
आणि तुला वाटतो आहे इंडिया जंजीर

तुला घेण्याइतकी तुझी लायकी नाही
म्हणत घेतला किस माझा धीरगंभीर

घराकडे जाण्यासाठी शॉर्टकट कशाला
तुझीच माणसे आहेत निवांत शीर


श्रीधर तिळवे नाईक

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

तुझे कसे होणार  सूर्य गोल्डकोटेड वाटतो
तुला अख्खा उजेडच  कोल्डब्लडेड वाटतो

त्यांच्यासाठी तुकाराम कॉन्टेम्पररी आहे
आणि तू आहेस कि देव तुला आऊटडेटेड  वाटतो

माहीत नाही कोण कोण माझ्यात बसून आहेत
मी मला नेहमीच फोरसीटेड वाटतो

सकाळी उठलो तेव्हा सर्व काही छान होते
दुपारी असे काय झाले उत्साह अडररेटेड  वाटतो

आयुष्य हरभऱ्याच्या झाडावर चढवते
दरवेळी  शेखचिल्ली  टॉप सीडेड वाटतो

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

श्रीधर तिळवे

हे सांगण्याइतका आता झालो आहे धीट
आय एक्झिस्ट बिकॉज आय इंटरप्रीट

माझ्याआधीच हे जग अस्तित्वात होते
माझ्यानंतरही ते चालणार आहे नीट

माझी भाषा म्हणजे माझी कल्पना आहे
माझ्यासाठी आहे ती कमालीची फीट

अनेक करंट दारावर  मारतायत थापा
दरवाजा उघडला तर असेल का सारे नीट ?

मी त्याचे खोटेपणही मस्त एन्जॉय केले
त्यालाही वाटले कि त्याने मस्त केले चीट

माझा मेंदू आहे म्हणे स्वप्नांचे मॉडेल
आणि मी म्हणे त्यांची लेडीज कीट


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

पोट्रेट काढावे तर पेन्सिल मोडलेली
आणि रंगांनीही रसद तोडलेली

माझेच नाव घेते  म्हणजे नक्की आहे
मला ऐकू येतायत तिने बोटे मोडलेली

गारा पडायच्या जवळजवळ बंद
पावसाने का ही रीत सोडलेली

तिला पाहता पाहता मला चष्मा लागला
तिला कुठे खबर कि ती आहे जोडलेली

प्रत्येकवेळी मी नव्याने लिहितो आहे
ज़िन्दगी माझी मी काल खोडलेली


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

ती असतांना हे कधीकधी घडते
काळीज थेट मेंदूपर्यंत चढते

रोज उठणे का आवश्यक  आहे
मग झोपायला का धडपडते ?

गच्चंकन कधीकधी असा खाली येतो
वर पाहणेही जडजड वाटते

जाणतो  भय माझे काल्पनिक आहे
तरी पाहताना का माझी फाटते

मी तिला एकदाच क्लिक केले
मी तिचा कॅमेरा झालो आहे वाटते

त्या फोटोपाशी आयुष्य थांबले
ज्यात पूर्णविराम आहेत तडफडते

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

श्रीधर तिळवे नाईक

फाळणीनंतर

फाळणीनंतर कुठे कविता बंद पडल्या
त्याही बायकांच्याप्रमाणे बाहेर पडल्या

कविता लिहिणे रानटी झाले तेव्हापासून
जणू  काही झालेच नाही असे दाखवत बाहेर पडल्या

तरीही लिहिलेच पाहिजे तरीही  जगलेच पाहिजे
दोन्हीत फरक काय प्रश्न विचारत बाहेर पडल्या

वेदना एकट्या होत्या मग त्यांना कीर्ती मिळाली
आणि शेवटी जाऊन पुन्हा काळोखात पडल्या

शेवटी साधले काय ?जनावराने उत्क्रांती केली
माणसाला शोधाया पुन्हा कविता बाहेर पडल्या
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)


ताण सोसणे ताप पेलणे आणि म्हणणे गुड मॉर्निंग
किती कमावलेले असते असे देखणे गुड मॉर्निंग

तुला कितीही वाटू दे विश करणे  गर्लिश आहे
पुरुषालाही स्टायलिश वाटते रोज म्हणणे गुड मॉर्निंग

प्रत्येकाच्या वाट्याला आलेला वेगळा दिवस
सूर्य मात्र तोच पहात वेगळेच प्रकाशणे गुड मॉर्निंग

ढगासारखे आत जाऊन दगडासारखी आंघोळ करणे
चेहऱ्याचा पाषाण हसता ठेवत सहज म्हणणे गुड मॉर्निंग

तुझ्या माझ्या देहामध्ये भाषाच फक्त कॉमन आहे
त्या भाषेची रोज नव्याने सुरवात करणे गुड मॉर्निंग
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

समुद्र पाहिला न्हवता तोवर समुद्राचा भाग होतो
समुद्र मी पाहिला आणि स्वतंत्र वेगळी आग झालो

एक जुळा प्रवाह होता एक रक्ताची भरती होती
एक फुल उमलले आणि मी अख्खी बाग झालो

गर्दीत कोणीही घुसू शकतो आणि गर्दी बनू शकतो
मी गर्दीतून बाहेर पडलो आणि स्वतंत्र वेगळा झालो

कोण आहे जो सेक्समध्ये बिलकुल गोंधळलेला नाही
मी तिच्यात कन्फ्युज झालो आणि क्लीअरकट  उडालो

मी त्याला कायमच स्वतःचा देह चघळताना पाहीले
तो काय आहे कळावे म्हणून  आरसा झालो आणि निघालो


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)


लोकांना फक्त गर्दी हवी आहे
फरक नाही पडत जुनी कि नवी आहे

बदलाने  शेवटी स्टेजवर प्रवेश केला
माहित नाही क्रांती कि जमवाजमवी आहे

आता तासभर तो छान बोलेल
नुकतीच कुणाला त्याने दिली शिवी आहे

सीता मंदोदरी सावित्रीवरच बोलू
विसरून जाऊ  आपली बायको नवी आहे

न माहीत सोबत मेकअप किट होती कि नाही
न कळे  टवटवी कि बनवाबनवी आहे

कविता न करणे हाही अभिनय आहे
अभिनयशून्य कविता ही कला उजवी आहे

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)


काय झाले माझे पाऊल अडखळले
फुलांमध्ये इथे दगड लपलेले

तू पाहतोस ते  प्रवाह आहेत
आतमध्ये त्यांच्या पाणी झोपलेले

थेम्ब थेम्ब थेम्ब रोज रंगवतो आहे
निसर्गाकडून लँडस्केप ढापलेले

त्याच्याकडे कुठलेच  शस्त्र न्हवते
धोखादायक ठरवून पाऊल कापलेले

पाण्याशिवाय माणसे तडफडून मेली
थम्सप पीत कॉलम छापलेले

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

आयुष्याने जेवढे जाळायचे तेवढे जाळले 
अन कुत्र्यासारखे माझ्या राखेस पाळले 

आई न्हवती तेव्हा भाषा आत होती 
भाषेने आईप्रमाणे मला सांभाळले 

प्रेम करत होतो कि माहिती देत होतो ?
सेक्समधून काय  एकमेकास कळवले ?

सुरवातीला इलेक्ट्रॉनिक पोएटिक वाटले 
माहित नाही देहातील काय नंतर कंटाळले 

त्याने सांगितले त्याला ठिकाण माहीत आहे 
त्याचे  गाव येताच उतरला म्हणाला मागे राहिले 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

जन्मल्यापासून माझ्या जातीची चौकशी 
ही व्यवस्था आहे कि हलकटगिरी ?

आडनावावरून काही अंदाज येईना 
गावात जाऊन त्याने केली एन्क्वायरी 

आजोबाला केले होते  बहिष्कृत 
कुठल्या जातीचा  कांहीं अंदाजगिरी ?

जातीशिवाय कुठला माणूस असतो का 
जातीशिवाय कशी ठरवायची माणुसकी?

मेला तरी कळेना श्री काय जातीचा होता 
त्यासाठी शेवटी नेमली त्यांनी कमिटी 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

तुझा कुठे कस लागला 
सूर निर्मळ समंजस लागला 

माकड रोबो बनून गाऊ लागले 
जिभेत मायक्रोफोन सरस लागला 

रोबोला रोबोपणाचा कंटाळा 
त्याला माणूस बनण्याचा तडस लागला 

समुद्रात फिल्म डिस्ट्रिब्युशन पोहचले 
चित्रपट दर्यामे खसखस लागला 

मी तर ऑरगॅनिक आंबा लावला 
मग कसा ऑटोमॅटिक आमरस लागला


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)झगे 

कितीही प्रयत्न कर थोडे उशीरापण येते 
मरणाच्या दारात माणसाला शहाणपण येते 

माझ्याजवळ नाहीत माझे काढलेले फोटो 
कुणी फोटो काढू लागला कि मला मृतपण येते

जरी तोडत चालला आहे प्रत्येक झाड 
माणसाच्या अंगातही झाडपण येते 

त्याला कुठे कळते स्वतःची आत्महत्या 
श्वास कमी पडतो तेव्हा हवापण येते 

मी घेत असतो नेहमी मरणाची रिस्क 
अशी रिस्क घेतानाच मला जिवंतपण येते 

तिच्या सौंदर्याचा मोह मला असा कि 
तिला पाहतांना मला कॅमेरापण येते 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

मी माहितीशी बोलतो आहे 
स्वतःचीच पोल खोलतो आहे 

अदृश्यांशी दृश्य संवाद 
दृश्य बनून डोलतो आहे 

आयुष्याचा एक्सपर्ट म्हणवतो 
आणि रोबोशी बोलतो आहे 

टाईमपास कि किलिंग टाइम ?
चाललंय  काय ? तोलतो आहे 

एक वारली नारळ बनून 
नारळाला सोलतो आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

इकडे आहे आणि तिकडे अस्तित्वाला असावेसे वाटते 
जिथे जन्मलो जगलो वाढलो तिथे पुन्हा जावेसे वाटते 

माहित नाही इथे असूनही तिथे मी कसा असणार 
माहीत नाही इथे असूनही मला तिथे का असावेसे वाटते ?

ज्या ठिकाणी काळीज लकाकले चमकले अन जिवंत झाले 
आयुष्याचे गाणे झाले तिथे पुन्हा गावेसे वाटते 

काव्यसंग्रहावर हाथ ठेवून प्रेमाच्या आणाभाका घेतल्या 
तिथे जाऊन काळजाचे आत्मचरित्र लिहावेसे वाटते 

जिथे देवावर विश्वास होता बळी जाण्याची तयारी होती 
तिथे जाऊन देव नाही हे गर्जून सांगावेसे वाटते 

एका क्षणात त्वचा झाडून बदलू शकतो माणूस स्वतःस 
हा भाबडा विश्वास पुन्हा कमवण्यासाठी जावेसे वाटते 

करू न शकलो जग दुरुस्त नि  आता मरणास टेकलो 
जग दुरुस्त करण्यासाठी पुन्हा निरागस जगावेसे वाटते 

माझ्या जखमी पायांस  पाहतो त्यामुळे कळणार नाही 
बेडरिडन माणसालाच नेहमी नाचावेसे वाटते 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

जे स्वप्न आहे ते स्वप्नच राहणार 
आणि तरीही माणूस स्वप्न पाहणार 

स्वप्न तुटले म्हणून रडणार नाही 
जखमेतून स्वप्नांचे तुकडे वाहणार 

जे जग मेले ते अस्तित्वात न्हवते 
जे अस्तित्वात आहे तेच मी पाहणार 

थुंकीत थोडे रक्त दिसणारच 
शेवटी काळीज मेले आहे वाहणार 

वाऱ्याची गती थोडी कच्ची आहे 
थांबलेला श्वास पक्की होईतोवर साहणार 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)


आपण ह्या जगात नेमकं करतो काय 
पितो पाणी तरी कळत नाय समुद्र म्हणजे काय ?

कागदाच्या पेपरसारखी हातातील  दुनिया 
कधीही ओली होते आणि पुन्हा वाळत जाय 

मी प्रथम दुःखाची शर्ट पॅन्ट घालतो 
मग त्यावर चढवतो सुखाचा कोट आणि टाय 

कधीतरी लहान मुलासारखे माझे घर होईल 
आणि जाईन मीही झोपी वर करून बिनधास्त पाय 

इथून पाहीली तर खिडकी किती सुंदर दिसते 
जवळ गेलो तर सिच्युएशन दिसते डू ऑर डाय 

मी तिच्याशी नेहमीपेक्षा आधिक प्रेमाने वागलो 
कुठेही कळू दिले नाही हा आहे माझा शेवटचा बाय 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

गाणे म्हणजे समुद्राखाली छत्री घेऊन रहाणे 
रक्ताचे फूल बनवणे आणि वहाणे 

तो गातो तेव्हा थेट पृथ्वीला भेटतो 
मी  पाहतो गळ्याचा ग्लास बनवून त्याचे मातीला पहाणे 

त्याच्या गिटारीने माझे उडते  गालिचे चोरले 
तो वाजवत नाहीये करतोय न देण्याचे खोल बहाणे 

जेवण आलेच नाही त्याने रिकामे ताट वाजवले 
मग निघाले ते थाट न्हवते होते भूकेत नाचत रहाणे 

तो म्हणाला माझा देव संगीतात राहतो 
मला आठवत राहीले त्याचे विकले जाणे अश्रूत नहाणे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

चांगल्या चांगल्या राहिल्या नाहीत वाईट आधीक वाईट झाल्या 
ज्या चांगुलपणाच्या पवित्र जागा होत्या त्या दाखवण्याच्या साईट झाल्या 

सर्वात उत्तम डिश म्हणून त्यांनी लोकांचे उरलेले उष्टे झोळीत  घातले 
मीही हसत हसत भिक्षा घेतली आणि हालचाली माझ्या लाईट झाल्या 

थंडीत घालण्यासाठी स्वेटर होते त्यावर तेलाचे धुळीचे डाग होते 
चार भिकारी सोबत त्यांना दिले तर कुणी घालायचे ह्यावरून फाईट झाल्या 

स्वस्तात थाळी होती तिथे रांगेत उभा  चेहऱ्यावर उडणाऱ्या चार माश्या 
त्या जेवणावर का बसत न्हवत्या माझ्याच चेहऱ्यावर का त्या टाइट झाल्या 

त्या रात्री गायिली मी माझी कम्पोझिशन्स डोळ्यातून दोन अश्रू आले 
मी बर्फासारखा घट्ट झालो आणि रचना डोळ्याच्या   पोलाइट झाल्या 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

मला वाटले भावना आहेत तबकड्या 
तर त्या निघाल्या  बाहुल्या कचकड्या 

तुझ्या कथेला पूर्णविराम नाही 
माझ्याही कानात अनंत बावड्या 

कम्पोझिशनच इतके डिफिकल्ट होते 
गाणे बनत गेले फाटक्या वावड्या 

कुत्र्यासारखा आयुष्याकडे परतलो 
मांजरासारख्या चाटत राहिलो रेवड्या 

इतक्या वेगाने कशा प्रसिद्ध झाल्या 
सेपियन्सननी उभ्या केलेल्या टेकड्या 

मेकुड बनावा तसा मृत्यू बनतोय 
नाक घेतंय श्वासांच्या उंच उड्या 




श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

प्रत्येक कारने रस्त्यावरती  चुकवले म्हणून वाचलो 
निवड झाली नाही म्हणून  अपघातापासून वाचलो 

भुकम्प होईल म्हणून मी काळजात पाहिली वाट 
प्रेमात नाही पडलो तिच्या काळजापासून वाचलो 

स्वातंत्र्याच्या जिलेब्या फक्त एकच  दिवस टिकल्या 
चोवीस  तासापुरताच  मी तिखटापासून वाचलो 

तिच्या वाढदिवसाला तिने आणला सोन्याचा केक 
केक कापून मी  पळालो आणि वाढीपासून वाचलो 

कार्डबोर्डपासून तिने विमान तयार केले 
ती बसून निघून गेली मी उभा राहून वाचलो 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

पक्ष्यांना कुठे ठाऊक आहे माझे दुःख 
ते येतात बसतात करतात टुकटुक टुकं 

प्रथमदर्शनी तिने रांगोळी घातली 
शेवटी कळाले ते होते तिच्या पतीचे मुख 

पाण्यात वाकून पाहणे अन शांत होणे 
आणि ठरवणे करायची नाही पुन्हा चूक 

शेवटी का अंधारात निघून जाते  
उजेडात दाखल झालेले सुख 

सेल्समन होता खूप बडबड केली 
मरताना झाला खूप खोलवर मूक 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

कवितेच्या अस्ताकडे समुद्रपक्षी निघाला 
प्रश्न आहे तो त्याचे मूलस्थान आहे का ?

कोणत्या गाण्याने त्याचे पंख ओलावले 
माझ्याप्रमाणे त्याचेही दुःख प्रधान आहे का ?

मी त्याचा फोटोग्राफ असल्यासारखा पाहतोय 
हा आरश्यातला मनुष्य माझे रोगनिदान आहे का ?

देवासारखा अस म्हणजे नेमका कसा असू 
तुझ्याजवळ फॉर्म्युला वा आकारमान आहे का ?

चंद्र सूर्याच्या सावल्या रोज माझ्यावर  पडतात 
माझ्याजवळ त्यांचे काही सामान आहे का ?

कितीदा मी रडणे ह्या बेडपाशी न्हेले आहे 
ह्या बेडपाशी माझा दिवान आहे का ?

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

भावना हाच नेहमी मुद्दा असतो 
कचाकचा असतो वा वचावचा असतो 

मर्डर हे काही सोल्युशन न्हवे 
मर्डरही शेवटी एक ढाचा असतो 

जे लिहायचे नसते त्याचे गद्य होते 
लिहायचे तो कवितेचा पाया असतो 

त्या लिंबूपाशी मी थोडावेळ थांबलो 
तो लिंबू आजकाल निळा असतो 

माझे एकटेपण पुन्हा परतले 
ते थोरले मी धाकटा असतो 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

जुना आणि नवा परस्परविरोधी 
ठरवणे अवघड कमी का जास्त अघोरी 

जगायचे तर गटस निर्माण कर 
हे जगच झाले आहे आता टपोरी 

कुठलीही वाढ संदिग्धच असणार 
ठाम बॉन्सायपेक्षा कधीही बरी 

तिला माझा आवाज ऐकायचा आहे 
शिळी होऊन पडलीये गळ्यात तरतरी 

तू सुद्धा मला बोअर वाटावीस ?
काळीज आहे कि कंटाळ्याची दरी ?

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

काळजाचा गुलाब खंगत चाललाय 
नाचत होता आता रांगत चाललाय 

तीही खोटं बोलायला शिकलीये 
हळूहळू भरोसा भंगत चाललाय 

द्राक्षासारखं  प्रेम फुटत चाललंय 
दारूसारखा जीव झिंगत चाललाय 

तिचा किसही काहिली काहिली 
आणि सूर्यही पेंगत चाललाय 

काय झाले नेमके काय तुटलंय 
ब्रेकप काय हुंगत चाललाय 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

एकमेकांसाठी कविता रडतायत 
कि एकमेकांवरती  ओरडतायत 

काल ज्यांना मी खांदा दिला 
ते  काळजात जिवन्त सापडतायत 

दूर असली कि गनवर हात ठेवते 
जवळ आली कि गन्ध धडधडतात  

नॉन्सेन्स प्रेमाचा सदगुण आहे 
फोन तिचे मला पटवतायत 

इन द बिगिनिंग गॉड वॉज नॉन्सेन्स 
सुरवातीनंतर कथा हडबडतायत 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

तिला प्रेम समजत नाही 
आणि समजणे माझी गरज नाही 

प्रेम म्हणजे एकांत मागणे 
आणि एकांतात ती कम्फर्टेबल नाही 

समाज एकटं होऊ देत नाही 
आणि सामाजिक असणं आता डेंजरस नाही 

एकटा असतो तो जगबदल मागतो 
आणि जगाला बदल मानवत नाही 

प्रेम समूळ उखडून टाकते 
आणि अवशेष गोळा करत नाही 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

परतण्याइतका बलवान होतो 
मी तिच्या घरी फक्त मेहमान होतो 

प्रेम इतके होते द्वेष उरला नाही 
जरी सोडतांना दोलायमान होतो 

क्षणात तिचे परके होणे आदळले 
क्षणात बाहेर  दरम्यान होतो 

जोक सांगत राहिलो हसवण्यासाठी 
आतून निष्प्राण वरून पंचप्राण होतो 

शेवटचा जिवन्त माणूस पहावा तसे पाहिले 
वळली अशी जसा तिचा अपमान होतो 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)


एकतर सर्वांना सोबत घेऊन भोंगळ बन 
किंवा एकट्याला तासत जाऊन शार्प बन 

बाजारबुणगे घेशील तर पानिपत होईल 
मोजके घेऊन अफझलखानचा कोथळा काढणारं वाघनख बन 

 गर्दी जमवणाऱ्याना डेली सर्दी होते 
मोजक्याच लोकांचे खणखणीत आरोग्य बन 

जे मित्र आहेत ते तुला समजून घेतीलच 
जे समजून घेणार नाहीत त्यांना सोड मजबूत बन 

मोजक्याच लोकांनी इथं इतिहास घडवला 
लोक इतिहास  कुणाच्या बाजूने कलतोय ते बघून मागोमाग येतील इतिहास बन 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

हे शहर नाही हे आहे म्युझियम तयार झालेले 
त्वचेवर राजेशाही कपडे काळजावर वार झालेले 

वादळाला शूट करून मी का  त्याचा वारा बनवला 
का श्वास माझे प्रेमात पडून तिच्या हवामानाचे दार झालेले 

थडग्यामधूनही इथे झाडे उगवली प्रेतांची झाली कबुतरे 
शहराची  ओळख करून देता देता गाईड  झोपेत ठार झालेले 

मंत्र गुणगुणावेत तसे सावल्या गुणगुणणारे देह सर्व 
प्राचीन कि अर्वाचीन ठरेतोवरअवयव अद्ययावत कट्यार झालेले 

माहित नाही कशाची नशा आहे प्रत्येकजण इथे झिंगतो आहे 
लपण्यासाठी कुठे जागा शोधावी तर अख्खे शहर बार झालेले 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

तुझ्या घरचे वातावरण कसे आहे 
जीवन कसे आणि मरण कसे आहे 

फोटोत सगळेच चुकीचे असल्यासारखे 
प्रत्यक्ष जगतांना अवतरण कसे आहे 

प्रत्येकजण पाणी सांभाळतोय ना ?
प्रत्येकाच्या काळजाचे धरण कसे आहे ?

नव्या फक्त आपण भींती निर्माण करतो 
जुन्या  मोकळिकींचे  जागरण कसे आहे 

झाडे एकमेकांशी अद्यापही बोलतात का  ?
कुळागरात भाषिक  पर्यावरण कसे आहे ?

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

ईश्वर मेला 
भक्ती जिवंत आहे 

पूजा चालूच 
अभिनय संत आहे 

मेंढ्यांच्या चाली 
एकामागोमाग जातिवंत आहे 

पायांवर डोके 
पाय अनंत आहे 

माहित नाही 
त्यालाही अंत आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

मी तिला दिले  काळजातली चांदणे मधाचे किस 
ती म्हणत राहिली किस बाई किस दोडका कीस  

तिने मला आयुष्यातून असे बाजूला काढले 
जसा लहानपणी तिला मी करायचो ढीस 

कारमध्ये बसून राहिला दोघांदरम्यान सन्नाटा 
मग तरंगायला लागले दरम्यान मोराचे पीस 

एका पाठोपाठ एक देहात दिवे ऑन केले 
प्रकाशाचा लोळ उठवला कारण करायचे न्हवते काहीच मीस 

ती थकेपर्यंत रक्तात गाणी गात राहिली 
मी तारा जुळेपर्यंत करत राहिलो घासाघीस 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

मी आत गेलो तर ती विमानाबाहेर गेली 
तिच्यापाठोपाठ तिची आठवण बाहेर गेली 

मी तीचा आवाज ऐकला म्हणून मागे वळून पाहिले 
क्षणभर वाटले तीच मग वाटले ती तर बाहेर गेली 

खूप सारे स्वर्ग झाले लॅण्ड माझ्या स्वप्नामध्ये 
मग तिने  टकटक केली झोप डोळ्याबाहेर गेली 

माझ्या डोळ्यासमोर त्याने अख्खा खम्बा खाली केला 
तरीही शुद्धीत बोलत राहिला दारू कुठून बाहेर गेली 

विमानातून घरी कि घरातून विमानात परततात ?
ते प्रवासी कोण ज्यांना कळत नाही जिंदगी आत गेली कि बाहेर गेली 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून) 


काट्याच्या अणीवर वसली तीन गावे 
ज्ञानकारण  समाजकारण परि राजकारण वसेचि ना 

वसेचिना तिथे तीन आले कुंभार 
पहिला गांधी दुसरा आंबेडकर परि  फुले  घडेचि ना 

घडेचिना त्याने आणली तीन मडकी 
वर्ण कच्चा जात कच्ची अन वर्ग काही भाजेचि ना 

भाजेचिना त्याने रांधले तीन मूग 
भांडवलवादी , समाजवादी परि मिश्रवादी काही शिजेचि ना 

शिजेचिना तिथे आले तीन पाहुणे 
रिपब्लिकन , काँग्रेस परि ओबीसीवाद काही जेवेचि ना 

जेवेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या 
आरक्षणवाद हिंदुत्ववाद  परी तिसरा काही लागेचि ना 

श्रीधर म्हणे याचा तो अनुभव 
भगवान शिवविना कळेचि ना 

श्रीधर तिळवे नाईक 
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)

युद्धातून परतल्यावर डोळ्यात बुद्ध होता 
युद्ध खोटे होते कि सैनिक खोटा होता 

चौकट काळी होती पण अंधार न्हवता 
पेंटर खोटा कि रंग खोटा होता 

ती मोजत राहिली शर्टावरच्या स्ट्रिप्स 
स्ट्रिप्स खोट्या होत्या कि शर्टच खोटा होता 

अंगातून माझ्या सारे रक्त वाहून गेले 
रक्त दिसेना म्हणाली ऍक्सिडन्ट खोटा होता 

खरा खरा खरा मी किंचाळत राहिलो 
म्हणाली शब्द खरा तू पण खोटा होता 

श्रीधर तिळवे नाईक 
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)



मला असे वाटते कि हा माझा सूड आहे 
मी हे जाणतो हा परतणारा आसूड आहे 

कधी शावोनिस्ट कधी भलताच प्रेमळ वाटतो 
कुठेतरी दरम्यान हे स्थिरावलेले बूड आहे 

तुझ्या अपमानित करण्यापुढे स्व शाबूत ठेवणे 
आणि तरीही दाखवणे तुझ्यापुढे न्यूड आहे 

तुझा माजी नवरा आत्ताच माझ्यापुढून गेला 
म्हणाला बघ मला तुझे मी फ्युचर धूड आहे 

तुझ्यासाठी वेगळा इतरांसाठी वेगळा नियम 
हा कसला  संसार  जिथे कायदा खत्रूड आहे 

तिने वाईन पीत पीत मला तिची चित्रे दाखवली 
मी पाणी पीत म्हणालो थम्सप खूपच रूढ आहे 

जे आहे ते डीलिंग आहे ह्याउपर बोलायचे नाही 
बोलायचे होते बोललो नाही बाजार तुझा रुड आहे 

तिच्या चित्रात एक बाई पूर्णपणे रक्ताळलेली 
तिच्या हातात एक गुलाब जो अजूनही हूड आहे 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून) 

परत ना  रे नवऱ्या परत कोल्हापूर पेलत नाही 
मी ज्युडोवाली बाई कुस्ती इथली आवडत नाही 

नर्व्हस ब्रेकडाऊन होतो परंपरा इथली पाहून 
इथल्या जून पाण्यामध्ये रक्त माझे पोहत नाही 

सर्वच काही तिखट करून आयुष्य जगता येते का 
किती किचन्स बदलली पण चव काही बदलत नाही 

अंगावरती बिकनी आणि हातामध्ये कुऱ्हाड 
मी तिला जाऊ देतो ती हातातून निसटत नाही 

एक उंदीर उत्क्रांत होत शेवटी माउस झाला 
आश्चर्य त्याच्यामागे मांजर कुठले लागत नाही 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून) 

प्रकाशाने अंधार पाहिला 
तेव्हा कुठे  कवी बनून राहिला 

पाणी हलते बनते तरंग 
लोक म्हणती लाटेने समुद्र वाहिला 

पशूस पैश्याचे दुःख नाही 
माणूस दारिद्र्याला कोसत राहिला 

गुरूने चंद्राकडे बोट दाखविले 
सूर्य आयुष्यभर हाताळत राहिला 

स्वतःचेच  खात राहिला मांस 
श्रीधर आयुष्यभर शाखाहारी राहिला 


श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्य फाईलीतून)