Tuesday, March 28, 2017

माझ्या गझलप्रेमाची कारणे श्रीधर तिळवे नाईक
माझ्या मित्रांना विशेषतः ज्यांनी मला फक्त मुंबईकर किंवा चौथ्या नवतेचा  कवी  म्हणून पाहिलेलं आहे त्यांना मी लिहिलेल्या गझलांबद्दल कायमच आश्चर्य वाटत आले आहे तू कशाला गझल अभंग ओवी आणि सुनीताच्या म्हणजे सॉंनेट्सच्या नादाला लागतोयस ? असा प्रश्न त्यांना कायमच पडला आहे शिवाय ह्या प्रत्येक फॉर्मबाबत मुक्ततेची म्हणजे मुक्त गझल मुक्त सॉनेट्स मुक्त अभंग मुक्त ओवी ह्याची केलेली मागणीही त्यांना प्रॉब्लेमॅटिक वाटली आहे ज्यांना युरोपियन साहित्याचा इतिहास माहीत आहे त्यांना माझ्या मुक्ततेच्या मागणीचे काही वाटत नाही मराठीत तर करंदीकरांच्या मुक्त सुनीतापासून विलास सारंगांच्या प्रतिसुनितापर्यँत वेगवेगळे प्रयोग झाले आहेत आणि त्यावर कुणी आक्षेपही घेतलेले नाही अभंग आणि ओवीबाबतही तेच ! प्रॉब्लेम फक्त गझलबाबतीत गझलकारांना आला आणि त्यांना आला म्हणून अनेकांना आला हे ते लोक आहेत ज्यांच्या पूर्वसुरींनी  शेक्सपिअरला फ्री व्हर्स मध्ये नाटक लिहितो म्हणून भरपूर ताप दिला होता रोमँटिसिझमने व्हर्स मुक्त केले म्हणून मुक्तछंदाची वाट सुकर झाली पण ह्यांना हे कोण समजवणार ?मी आयुष्यात कधीही मुक्त पादाकुलक हा वाक्यप्रयोग वापरलेला नाही कारण पादाकुलक हे वृत्त आहे ह्याची मला कल्पना आहे पण गझल अभंग ओवी   वृत्त आहे का ? तर नाही ! हा काव्यप्रकार आहे आणि काव्यप्रकार मुक्त झाले पाहिजेत असे माझे मत आहे काव्यप्रकार ही वृत्ती  असते वृत्त नसते ती आशयाची गरज असते अभिव्यक्तीचा साचा न्हवे तर गझल ही मला वृत्ती म्हणून भावते म्हणून मी गझल लिहितो .

 काय आहे ही वृत्ती ? ही वृत्ती आहे प्राचीन काळातील फक्त एका श्लोकात आशयाचे सर्वस्व ओतण्याऱ्या ऋषींची !गझलेचा एकेक शेर म्हणजे प्राचीन संस्कृत व प्राकृत साहित्यात श्लोकात वा पदात वा कारिकेत सांगितलेले सत्य ! संस्कृतमधील सुभाषितश्लोकमालिका किंवा गाथासप्तशती मधील एकेक कविताकारिका आणि गझलेचा एकेक शेर मला एकच वाटतात . संक्षिप्ततेत शहाणपणाचा आत्मा असतो त्याचे प्रत्यन्तर ह्या काव्यप्रकारात येते ह्याचाच पुढे आधिक विकास करून मी विछंद मांडला आणि अ डा हॉ कॉ बा ना सु  ना त अनेक विछंदी कविता सादर केल्या होत्या ह्याची सुरवात गझलेमुळे झाली  होती म्हणून मला गझलेविषयी प्रेम  आहे

गझलेविषयी प्रेम असण्याचे दुसरे कारण म्हणजे माझ्या काव्यवाचनाची सुरवात ज्या काव्यसंग्रहाने केली तो संग्रह सेतुमाधवराव पगडींनी अनुवाद केलेला दिवाने गालिब होता. साहजिकच गझल हे माझे प्रेम झाले मी त्यातून नंतर बाहेर आलो पण शेवटी पहिले प्रेम हे पहिले प्रेम असते तोवर माझे कवितेचे वाचन हे निवळ  साधकाचे वाचन होते गझलेने मला काही काळ का होईना साधकाचा प्रेमी बनवला पोषक न्यू कॉलेजचे वातावरण होतेच माझ्या दोस्तांना पोरी पटाव्यात म्हणून त्यांच्या त्यांच्या प्रेमिकेनुसार कविता आणि त्यातही गझल लिहून देणे गरजेचे असे ''तूझ्या कवी असण्याची सार्थकता आम्हाला पोरी पटण्यात आहे '' असे माझे मित्र आजही म्हणतात  मिलिंद गुर्जरसारखे काही बहाद्दर असे कि मी लिहिलेली कविता मी विसरून जायचो पण ह्यांना पाठ असायची राजकुमार यादव तर माझ्या सगळ्या कविता मी पाण्यात बुडवेन किंवा जाळेन म्हणून एक कॉपी त्याच्या हस्ताक्षरात लिहून काढायचा तर महेश पुसाळकरने माझ्या  त्या काळातल्या सर्व कविता जतन करायचा सपाटा लावला होता आज डेकॅथलॉन  सिरींजमधल्या ९० % कविता महेशमुळे उपलब्ध झाल्या आहेत अन्यथा मी ह्या कविता विसरून गेलो होतो   त्या काळात मी  मला मिळालेले बक्षिसाचे कपही गटारात फेकून द्यायचो त्यामुळे माझ्या मित्रांची  भीती निराधार न्हवतीच  गझल ही माझी त्या मस्त काळाची मस्त आठवण आहे अर्थात हा प्रेमी फार काळ टिकला नाही पण तो अवतरणे हे छान होते साधक पुन्हा  प्रबळ होत गेला तसे गझल लेखन जवळ जवळ  थांबले पण तोवर शेकडो मुक्त गझला लिहून झाल्या होत्या पुढे मुंबईत मी गझलेपासून काहीसा दुरावलोच त्यामुळे माझ्या चॅनेल सिरीजमध्ये धड पन्नास साठ गझलाही सापडायच्या नाहीत ह्याचा अर्थ माझ्या गझलेत साधक अवतरला नाही असे नाही काही गझला तर साधकाच्याही आल्या

गझलबद्दल मला प्रेम वाटण्याचे तिसरे कारण आहे गझलेचा सर्वव्यापीपणा ! गझल हा एक असा काव्यप्रकार आहे जो समाजातील कलासंस्कृतीतीतील १ अभिजात  २ मध्यम आणि ३ लोक अश्या तिन्ही संस्कृतींना सारख्याच प्रमाणात अपील होतो ज्या काळात कवितेचे अस्तित्वच धोक्यात आलंय त्याकाळात गझल हे कवितेच्या अस्तित्वाच्या लढाईतील फार महत्वाचे हत्यार आहे असे मला वाटते त्यामुळेच गझलेत जितके अधिक कवी शामिल होतील तितके बरे असे मला वाटते त्यासाठीच एकविषयी बहुविषयी वृत्तछंदबद्ध मुक्त अश्या सर्वच प्रकारची गझल लिहिली जाणे आवश्यक वाटते कुठलाही कलाप्रकार हा मुक्ततेत वाढतो मुक्तता नसली कि संस्कृतसारखी अभिजात भाषाही मरणपंथाला लागते .
श्रीधर तिळवे नाईक

आता दशानन ह्या गझलप्रकाराविषयी





श्रीधर तिळवे नाईक
दशानन गझल हा एक गझलप्रकार आहे ह्यात दहा विषयावर प्रत्येकी किमान दहा शेर लिहिले जातात ह्यानिमित्ताने समाजाचे वा व्यक्तिमत्वाचे दहा चेहरे सादर केले जातात इथे एक दशानन मुक्त गझल देतोय दशानन गझल वृत्त छंदातही लिहिली जाऊ शकते

दशानन गझल शिवभक्त रावणाच्या स्मृत्यर्थ इथे देतो आहे 

चंद्रशेखर सानेकर to श्रीधर तिळवे नाईक


दशानन गझल असा काही पदार्थ वस्तू प्रकार नाही, कधीच नव्हता श्रीधर. ही तुझी भयंकरच फेकाफेकी थापेबाजी बंडलबाजी आहे..
बाकी तुझं हे चालू दे..


श्रीधर तिळवे नाईक to चंद्रशेखर सानेकर


चंद्रशेखर सानेकर दशानन गझल हा प्रकार होता असे मी कुठेही म्हंटलेले नाहीये मी आहे असे म्हंटले आहे हा प्रकार मी शोधलाय परंपरेत अडकलेल्या लोकांना ज्यांचा जीव आजाद गझल वा मुक्त गझलला पाठिंबा द्यायला खालीवर होतो त्यांच्याकडून अश्याच प्रतिक्रियेची अपेक्षा होती आम्ही वृत्तात लिहितो तीच गझल असा अभिमान असणे योग्य पण त्याचा माज चढला कि माणूस कर्मठ होतो एके काळी धार्मिक नैसर्गिक युगात  गझल ही एका विषयावर लिहिली जात असे आणि गालिब ज्याला बाप मानतो त्या मीरने अश्या सुंदर गझला लिहिलेत माधव जुलियननी आपल्याकडे अश्या गझला लिहिलेत आणि त्यांना कविता म्हणून हिणवण्याचे उद्योग भटवादी  लोकांनी केलेतच सृष्टीय गझलेत अनेक विषय एकाच गझलेत गुंफण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि मराठीत अश्या प्रकारची गझल सुरेश भटांनी आणली सृष्टीयतेत रोमँटिक नवता  प्रबोधनवादी नवता घडल्या त्यात रोमँटिक नवतेत उत्कृष्ट गझला गालिबने लिहिल्या तर प्रबोधनवादी गझला इकबालने लिहिल्या मराठीत आधुनिक गझलेची धारा सुरु केली ती विंदा करंदीकरांनी पण त्यांनी वृत्तछंद मर्यादा तोडली नाही कारण त्यांच्यावरचा माधव जुलियनांचा प्रभाव १९६० नंतर मराठीत देशीवाद आला आणि त्याचबरोबर आली देशीवादी गझल हिंदीत गोपालदास नीरज व  दुष्यन्तकुमार तर मराठीत सुरेश भट हे ह्या देशीवादी गझलेचे प्रवर्तक त्यांच्या प्रभावाखाली हिंदी गझलेचा व मराठी गझलेचा स्वतंत्र चेहरा शोधण्याचा प्रयत्न झालाय आणि सगळी ऎशोत्तरी पिढी त्यांचा वारसा चालवतीये ज्यात तूही येतोस . प्रश्न असा आहे कि आपण ह्यापुढे जायाचे कि भटांनी दिलेली गझलेची बाराखडी गिरवत बसायचे ?जे काम विंदांनी केलंय ते पुढे न्यायचे असेल तर मुक्त गझलेशिवाय पर्याय नाही असे मला वाटते म्हणूनच मी मुक्त गझल लिहितो पण तुम्हा लोकांच्यासारखा मी कर्मठ नाही त्यामुळे वृत्तछंदात लिहिणाऱ्यांना मी नेहमीच मान दिलाय तुम्हा लोकांना मुक्त ची एव्हढी भीती का वाटते ? वास्तविक जगात सर्वत्रच मूळ साहित्य प्रकार व काव्यप्रकार मुक्त होत गेले उदाहरणार्थ सुनीत हा गझलेसारखाच जगभर पसरलेला प्रकार पण तिथेही मुक्त सुनीत हा प्रकार स्वीकारला गेला खुद्द विंदांनी मुक्त सुनीते लिहिली मुस्लिम संस्कृतीचा गझलेसंदर्भातला कर्मठपणा मी समजू शकतो पण इतर संस्कृतींनी हा कर्मठपणा का स्वीकारावा ? १९८५ च्या आसपास श्रीराम पचिंद्रेच्या घरी खुद्द सुरेश भटांशी माझा ह्यावरून वाद झाला होता भटांच्या  आणि तुमच्या भूमिकेत काही फरकच दिसत नाही जे आश्चर्यकारक आहे गझलेत एक
 कुळ कोल्हापुरी आहे जे कोल्हापुरातून माधव जुलिएन विंदा करंदीकर श्रीधर तिळवे असे प्रवास करते आहे तर दुसरे स्कूल भटांचे आहे ज्यात तूही येतोस आणि ह्या स्कूलची गझल पुढे न्हेण्यात तुझा फार मोठा वाटा आहे असे मी मानतो . पण  गझल म्हणजे फक्त भटांचे स्कूल न्हवे त्यात ज्या स्कूलने मराठीत गझल आणली ते कोल्हापूर स्कूलही येते भटांचे स्कूल  सातत्याने कोल्हापूर स्कूलला नकार देते आहे द्या तुमचा अधिकार  आहे पण बेछूट तोल सुटल्यासारखे आरोप करणे बरे न्हवे वस्तुस्थिती विचारा कोल्हापुरी स्कूल प्रयोग करायला घाबरत नाही विंदांच्या गझला मला भटांपेक्षा आधिक आडवान्स वाटतात आणि तसे वाटण्याचा मला अधिकार आहे मुक्त गझल आणि चिन्हछंदी गझल अश्या दोन प्रकारच्या गझला मी लिहिलेत आणि फेसबुकवर व संग्रहात टाकलेत तू वृत्तछंदाच्या प्रेमात आहेस असं उत्तमच आहे पण इतरांनीही असलेच पाहिजे हा दुराग्रह झाला आम्ही म्हणतो तीच गझल ही हुकूमशाही झाली मी कधी मुक्त गझल हीच आत्ताच्या युगातली खरी गझल असा स्टान्स घेतलेला नाही ह्या मुक्त गझलेचा एक उपप्रकार म्हणून दशानन गझल मी शोधली आणि मांडली त्यात मीरची एकाच विषयावरची गझल आणि नंतरची अनेक विषय कवटाळणारी प्रचलित गझल ह्यांचा समतोल आहे . हा प्रकार तू आवडून घ्यावास अशी सक्ती नाही . दहा तोंडाचा रावण हा माझा मी दाक्षिणात्य असल्याने हिरो आहे त्यामुळे मी त्याचे नाव दिलंय एवढच .

श्रीधर तिळवे नाईक

चंद्रशेखर सानेकर to श्रीधर तिळवे नाईक

श्रीधर
चंद्रशेखर सानेकर तुझ्या गझलविषयीच्या या गफलती आहेत, आणि त्या गेल्या तीसेक वर्षापासून तशाच आहेत, तर तशाच कवटाळून रहा, माझं काय, कुणाचच काही म्हणणं नाही. तू जे काय एवढं भरताड लिहिलयस तो फक्त तुझ्या गोंधळाचा निर्जिव कडबा आहे. तु तो जपतोयस तर जपत रहा. 
तू एखादी तरी धड अस्सल गझल लिहिली असतीस तर तुला बेनिफिट अॉफ डाउट द्यायला हरकत नव्हती, पण तुझ्या गफलतींचं, गैरसमजाचं जे अडाणी समर्थन करतोयस ते बधीर करणारं आहे. 
तुला गणपतीचं चित्र काढता येत नाही तर काहीत हरकत नाही, त्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. पण जे काढू शकतात त्याबद्दल तू जे काय बोलतोयस ते वाचून मनोरंजन झालं. तू जे वर मुद्दे मांडलेयस ते वाचून अकादमीक कारकुनी करण्याच्या श्रमात हुशार आहेस एवढच दिसतं, नाहीतर इतक्या काळात तुझ्या दृष्टीत काही फरक पडला असता.
तू काय करतोयस, 
तू कुठल्यातरी अॉक्टोपसचं तुला जमेल तसं चित्र काढतोस आणि " हे बघा, गणपतीचं चित्र असं पण काढायला पाहिजे "असं सांगतोयस.
अॉक्टेपस हेच कसं मला गणपतीचं चित्र मला बरोबर वाटतं, आणि तुम्ही काढता ते गणपतीचं चित्र कसं चूक, हे पटवण्याचा निरर्थक आटापिटा करतोयस. हे वरचं लिखाण त्यातलच. 
तुझ्या वरच्या तकलादू मुद्याना टाइप करून उत्तर देणं म्हणजे स्वत:ला आजारी पाडून घेणं आहे. असो. 
कधी भेटलो तर जमल्यास बोलू, पण त्याचा तुला तर नाही, मला पण नाही, कोणालाच उपयोग होणार नाही.
हे तुला इथे दिलेलं उत्तर. हा राडा माझ्या बाजूने इथेच खतम...

श्रीधर तिळवे नाईक to चंद्रशेखर सानेकर राडा तूच सुरु करणार फेकाफेकीचा गंभीर आरोप करून आणि त्याचे उत्तर मी दिले तर ते कारकुनी  म्हणून राडाही तूच संपवणार ! म्हणजे आरोप सिद्ध करण्याच्या जबाबदारीतून तू मुक्त ! असो ! आरोप सिद्ध करता नाही आले कि लोक त्रागा करतात . तुझे उत्तर हा फक्त त्रागा वाटला . खरेतर २१ मार्चला तू टाकलेली पोस्ट प्रदीप निफाडकरचा गझलेवरील एक लेख रुपेश देशमुखच्या पोस्ट ह्यातून गझलेची एक भूमिका जी भटवादी आहे सातत्याने पुढे येतीये ती अशी 
१ गझलेत प्रत्येक शेर स्वतंत्र वाटला पाहिजे 
२ गझल रदीफ आणि काफिया वा नुसता रद्दीफ वा काफिया ह्यांनी चालली पाहिजे 
३ गझल अक्षर वा मात्रा वृत्तात लिहिली पाहिजे 
भटांनी गझलेच्या बाराखडीत ही भूमिका मांडली आहेच आणि तुम्ही सर्वच ती भूमिका घेऊन लिहिताय . 
माझ्या गझलेचे दोन टप्पे आहेत 
१ मुक्त गझल ह्या टप्प्यात मी तिसरी अट पूर्ण नाकारली कारण आधुनिक काळ हा मुक्तछंदाचा असल्याने तिने वृत्त छंदाचे बंधन पाळायची काहीही गरज नाही असे माझे मत बनले 
२ चिन्हछंदी  गझल ह्या टप्प्यात मी तिसऱ्याबरोबर दुसरी अटही नाकारली  आणि फक्त १ गझलेत प्रत्येक शेर स्वतंत्र वाटला पाहिजे ही पहली अटच स्वीकारली  
रोधात कट कारस्थाने करण्यात ज्या कवींची हयात गेली त्यांच्याही आवडत्या कवितांना मी दादच दिली आहे आणि त्यांच्या कारस्थानाबद्दल फक्त करुणा दाखवली आहे त्यामुळे तू वापरलेल्या भाषेबद्दल आणि आरोपांकडे मी फक्त करुणेने पाहू शकतो तुझ्यासारख्या कविला मी अशी भाषा वापरण्यास उद्दयुक्त केले त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे 
आत्ता गझलेची प्रस्थापित संरचना नाकारणारा कवी कारकून कि भटांच्या मठातून आलेल्या बाराखडीला जसेच्या तसे फॉल्लो करणारा कवी कारकून हे तूच ठरवलेले बरे मुक्त गझलेला आज ना उद्या बरेच लोक भेटतील कारण नवी पिढी वृत्तछंदात लिहील ह्यावर माझा तरी विश्वास नाही त्यामुळे गझलेची पारंपरिक गढी २०४० नंतर कोसळणे अटळ चिन्हछंदी गझल स्वीकारायला मात्र वेळ लागेल ज्या गोष्टीला (म्हणजे वृत्त छंदात गझल लिहिणे ) मी नकार दिलाय ती गोष्ट मी का करू ? हे म्हणजे दारुड्याने निर्व्यसनी माणसाला आधी दारू पिऊन व्यसनाधीन व्हा आणि मग दारू सोडून दाखवा असे म्हणण्यासारखे आहे बरं तुमच्याकडं काही मी मुक्त गझलेसाठी सर्टिफिकेट मागायला आलेलो नाही मी फक्त माझी भूमिका मांडतो  वृत्तछंदात लिहितात  म्हणजे मागासलेले असंही हेमंत दिवटे किंवा सचिन केतकारासारखं म्हंटलेले नाही उलट मुंबई विद्यापीठात ह्या लोकांनी अशी भूमिका मांडली तेव्हा त्यांना मी ठाम विरोध केला होता पण वृत्तछंदात गझल लिहिणारेच फक्त महान हेही मला मान्य नाही मात्र मुक्त गझलेला विरोध करणारे मात्र कर्मठ आहेत असे माझे मत आहे मुक्त गझलेला सहजासहजी मान्यता मिळेल अशी माझी अजिबात समजूत नाही पण हुळहुळू ती जागा तयार करेल असं मला वाटतं . 
आणि सर्वात शेवटचा मुद्दा !  गझल ही वृत्तछंदातच का लिहिणे सक्तीचे आहे हे तुमच्यापैकी कुणी सांगत नाही.  ते तुम्ही सांगणे आवश्यक आहे विशेषतः आत्ताच्या काळात आणि मुक्त गझल लिहिण्यात गझलेचे काय नुकसान आहे तेही तुम्ही मांडले पाहिजे  एकेकाळी संगीतासाठी ती वृत्तछंदात आवश्यक होती पण आता ती तशी राहिली  नाही एकीकडे गझल संगीतासाठी लिहिली जात नाही म्हणावयाचे आणि दुसरीकडे ती वृत्तछंदात असली पाहिजे असा दुराग्रह धरायचा ह्याला अर्थ  नाही मी माझ्या मुक्त गझला लोकांच्यात सादर केल्या आहेत आणि लोकांना गझल मुक्त कि वृत्तछंदबद्ध ह्याने काहीही फरक पडत नाही हा माझा अनुभव आहे राहता राहिली गोष्ट संगीताची तर माझ्या बहुतांशी मुक्त गझला मी संगीतबद्ध केल्या आहेत थोडी संगीतकार म्हणून मेहनत ज्यादा पडते एव्हढेच तुझ्याशी मी राडा घेतलेलाच नाही मी फक्त वाद घालतोय त्याला तुम्हा लोकांच्याकडे उत्तर नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे एकेकाळी मुक्त छंदात कविता आली तेव्हा असाच आरडाओरडा करण्यात आला पु ल देशपांडे ह्यात आघाडीवर होते आणि तू दिलेला गणपती आणि ऑकटोपसचा दृष्टांत त्यांनी वेगळ्या भाषेत दिला होता पण पुढे ज्या मर्ढेकरांच्या कवितेची त्यांनी चेष्टा केली होती त्याच मर्ढेकरांच्या कवितांचे वाचन करण्याची वेळ त्यांच्यावर आली तर मित्रा काळालाच ठरवू दे कि माझ्या मुक्त गझला चांगल्या कि वाईट ? एक गोष्ट मात्र पुन्हा सांगतो मी तुझ्या गझलेचा फॅन होतो आणि राहणार तू एवढ्या शिव्या घालूनही माझे तुझ्याविषयीचे मत बदलावे असे मला वाटत नाही 
श्रीधर तिळवे नाईक 


Chandrashekhar Sanekar  toश्रीधर तिळवे नाईक 

 तू गझलची सरंचना कशी काय समजून घेऊ शकत नाहीस हा मला पडलेला अत्यंत दु:खद प्रश्न आहे. तू जो विचार करतोय तोच इतका विचित्र आणि अस्ताव्यस्त आहे की त्यातून तुला गझलचा तुला पडलेला पेच सोडवता येईल असं वाटत नाही. हे बघ मर्ढेकरांनी आपली सगळी तीव्र आधूनिकता वृत्त आणि छंदावरच बुलंदपणे तोलली, त्यांना काही कसं अडलं नाही ? हे गालिब, फिराक, फैज, दुष्यंत, विंदा कुणालाच अडचणीचं नाही वाटलं. 
तुझा खरा प्रॉबलम हा आहे की तुला मुक्तपणाचा बेशिस्त धिंगाणा जमतो, वृत्ताची डिसिप्लीन अजिब्बात झेपत नाही, कळत पण नसावी. पण ते सगळं तू अशा विचित्र मुद्यांच्यामागे दडवतोयस. पण या तुझ्या हतबलतेला तू वेगळापणा वगैरे म्हणतोयस.

तुझ्यासारखा एक प्रयोग साठेक वर्षापुर्वी पाकिस्तानचे मोठे कवी कतील शिफाई यानी केला होता. त्यांच्या त्या गझलाही कमालीच्या सुंदर आहेत. वृत्तात नसूनही खूप रिदमीक. पण तो त्यांच्यापुरताच प्रयोग ठरला, तो प्रयोग त्यांच्यापाशीच थांबला. त्यानंतर तमाम उर्दू कवी वृत्तातच लिहिताहेत, अगदी आज 21 व्या शतकात पण.
तू जे काही मुक्त वृत्तात गझल म्हणून लिहिलयस ते वाचवतही नाही. ना धड गझल, ना धड कविता, ना धड मुक्तछंद. तुला वृत्ताचीच काहीतरी बेसिक अडचण वाटत असावी. 
वृत्त-छंद ही पण एक सत्ता, एक शक्ति आहे, मुक्तछंद ही पण एक शक्ति आहे , पण कवितेचं सौंदर्यच कशातून निर्माण होत नसेल, फक्त आपला अडाणीपणा लादला जात असेल तर काय चाटायचीय असली वांझ बंडखोरी ?



श्रीधर तिळवे नाईक to चंद्रशेखर सानेकर


मी गझलेची मला समजलेली तुमच्याच लोकांकडून आलेली संरचना आधी मांडलिये ती चुकीची आहे का ? आणि मी मग त्यातील काय नाकारतोय ते स्पष्ट केलंय ह्यातलं काय चुकीचं आहे ते तू सिद्ध कर तुझा मुद्दा भटांचाही होता तो म्हणजे मर्ढेकरांनी वृत्तात लिहून आधुनिकता प्रकट केली कि नाही ? माझ्या मते जे काम मर्ढेकरांनी अभंग ओवी आणि पादाकुलक वापरून केले तेच काम करंदीकरांनी अनेक वृत्तात गझल  लिहून केले पण पुढे किती आधुनिकतावादी कविंनी मर्ढेकरांना फॉल्लो केले सर्वांनी मुक्तछंद स्वीकारला करंदीकरांच्यानंतरच्या गझलकारांनी मुक्त गझल स्वीकारून हे केले असते तर बरे झाले असते पण असे का झाले नाही ?

उर्दूत झरीना सानीनी अश्या गझला लिहिलेत त्यातील दोन पुढे देतोय  १९७३ सालची प्रथम




ग़म में गुज़री खुशी में गुज़र जायेगी


ग़म में गुज़रे खुशी में गुज़र जायेगी
ज़िन्दगी फूल की पंखडी है, बिखर जायेगी
दिल के औराक पर शबनमी याद के इतने छींटे पड़े
धूप ग़म की चढ़ी है, उतर जायेगी
कामरा ज़िन्दगी के है ज़ामिन, अमल और जहद मुसलसिल, खुदी का तहफ्फुज़, शउर जहाँ
ये ग़लत है लि उनकी निगाहे करम संवर जायेगी
ख्वाब के धुंधले साये तले कब तलक ज़िन्दगानी गुज़ारोगे तुम
अब कि अहवोफग़ां बे-असर जायेगी
तर्ज़ुरबाती ग़ज़ल साज़े दिल के सुरों पर ज़रा छेडिये
उसकी आवाज़ से एक खुशबू उड़ेगी जिधर जायेगी
आगही नफ्स की, लाशउर और तहतश-शउर  और शउर
वक्त के हैं तकाज़े, जो समझो उसे जिन्दगानी ए “सानी” संवर जायेगी
This aazad ghazal was published in “Mahanama Ilmo Danish” in April 1973
दुसरी १९७९ ची आहे




चश्म खैरा को एसी चमक चाहिये 


चश्म खैरा को एसी चमक चाहिये
अज़्म तकमील पायेगा तूफान की सी लपक चाहिये
सीधे सादे उसूलों पे जीने न दें
ये सियासत ही दुनिया है ! इसे लचक चाहिये
एसे मलबूसे सादा की बज़्मे तरब में इजाज़त नहीं
ठहरिये ठहरिये ! कुछ भड़क कुछ चमक चाहिये
खूबसूरत है ग़ुलमोहर, खुशबू से महरूम है
आज के दौर में कागज़ी फूल में भी महक चाहिये
महफिले रक्स रंगी नही है मसाफे जहाँ
चूड़ियों की खनक आप रखिये इधर तैगो-खंजर की “सानी” झनक चाहिये
This aazad ghazal was published in “Kohsar” Hazaribag in January 1979

तू म्हणतोस तसे उर्दूत हे आंदोलन थांबलेले नाही हे सिद्ध करायला ह्या दोन गझला पुरेश्या आहेत 
रऊफ पारेख ह्यांनी लौ च्या जाने फेब च्या अंकातील  आझाद गझलची चर्चा अलीकडेच केली आहे आणि आजही हा वाद कसा चालू आहे त्यावर टिपण्णी केली आहे 
तुला गझलेतील नवीन संरचना समजत नसतील तर तो तुझा प्रश्न आहे माझा नाही जगभरच्या कवितेत काय चाललंय हे मी नेहमीच समजून घेत आलोय चिन्हछंदी गझल हे मात्र खास माझे अपत्य आहे माझे कवितालेखन जवळ जवळ थांबलंय त्यामुळे पुढे मी किती चिन्हछंदी गझल लिहीन कुणास ठाऊक ? वृत्तछंद आणि मुक्तछंद ह्या दोन्हीही शक्ती आहेत हे मलाही मान्य आहे त्यामुळेच वृत्तछंदात लिहिणाऱ्यांना मी कायमच आदर दिलाय तुझ्यासारखे ह्यांना मुक्त गझल लिहिता येत नाही म्हणून हे वृत्तछंदात लिहितात वैग्रे उलटे  फालतू आरोप मी कधी केलेले नाहीत प्रॉब्लेम तुमचा आहे तुम्हाला तुमचा कर्मठपणा सोडवत नाहीये नका सोडू कारण हा पिंडाचा प्रश्न आहे माझा वृत्तछंदात लिहिण्याचा पिंड नाही पण म्हणून मी माझ्या पिंडाची गझल लिहायचीच नाही अशी ऑर्डर तुम्ही काढणार आहात काय ?आता जे कलाकृती म्हणून आहे त्याचा दर्जा ठरवण्याचा अधिकार नक्कीच तुला आहे तू असे म्हणू शकतोस कि तिळवेंनी लिहिलेल्या सर्व मुक्त गझला फालतू आहेत तुझ्या पण सर्व गझला मला आवडत नाहीत किंवा आवडलेल्या गझलेतील सर्वच शेर आवडतात असे नाही मला तीन जरी शेर आवडले तरी मी ती गझल  चांगली म्हणतो मला सुरेश भटांच्या ९५ % गझला फालतू वाटतात पण म्हणून मी त्यांचे योगदान नाकारत नाही त्यांनी प्रयोग केले नसते तर तुम्हा लोकांची गझल ही  जन्मली नसती  गझलेचा प्रत्येक शेर स्वतंत्र असतो हे महाराष्ट्राला सुरेश भटांनी शिकवले आणि हे त्यांचे प्रचंड मोठे योगदान आहे माधव जुलियननी गझल आणली हे जसे असाधारण योगदान आहे किंवा विंदा करंदीकरांनी गझलेला मराठी मध्यमवर्गीय चेहरा दिला हे जसे प्रचंड योगदान आहे त्याच लेवलचे हे सुरेश भटांचे योगदान आहे ह्याशिवाय त्यांनी गझलेला मध्यमवर्गातुन बाहेर काढले हेही महत्वाचे योगदान आहे  प्रश्न आहे आपण पुढे जायचे कि नाही प्रायोगिक लिहिणाऱ्यांना धोका पत्करावा लागतो तू म्हणतोस तशी बंडखोरी वांझही ठरू शकते पण हा धोका माधव जुलिएन , विंदा आणि सुरेश भटांनी पत्करला नाही काय ? आवड ही फार वैयक्तिक गोष्ट आहे मित्रा आणि ती बदलूही शकते आणि मुळात त्यासाठी समोरच्याचे बायस न होता वाचावे लागते असो ह्या निमित्ताने पुन्हा एकदा मुक्त गझलेची बाजू मला अनेक मार्गानी मांडता आली हेही नसे थोडके  

श्रीधर तिळवे नाईक 

वृत्त छंदाच्या कृत्रिम शिस्तीत तुम्ही लोकांनी ग्रेप फ्रुटस तयार केली उलट मुक्त गझल नैसर्गिकरित्या फळांना येऊ देतंय

हे कोण ठरवणार ?तुम्ही ? हे म्हणजे दोन संघातल्या मॅचमध्ये एका संघाने स्वतःला विजयी घोषित करण्यासारखे आहे

शिस्त कृत्रिम असते आणि ह्या शिस्तीची आता काहीही गरज राहिलेली नाही
मग मुक्त गझला आणि वृत्तछंदबद्ध गझला दोन्हीही कविता म्हणून वाचा जश्या मी वाचतो माझ्यापुढे उर्दूतल्या जेव्हा मुक्त गझला आल्या तेव्हा त्या मी मनमोकळे पणाने वाचल्या ह्या आझाद गझला गझलांचं न्हवेत असं ठरवून नाही वाचल्या मला त्यांचा फॉर्म आवडला आणि मराठीत तो मी आणला नंतर १९८५ पासून खुद्द सुरेश भटांशी त्यावरून वादही घातला अलीकडे सर्व गझलकारांनी ठरवून जेव्हा आझाद गझल ही आझाद गझल न्हवे असा निर्णय घेतला तेव्हा मी पुन्हा एकदा मैदानात उतरलो

क्र्रेक्ट ! तुम्ही म्हणता तेच मला म्हणायचे आहे . प्रत्येक शेर हा ट्विटच असतो आझाद गझलेतही प्रत्येक शेर tweet च असायला हवा हा तर गझलेच्या आकृतिबंधाचा प्राण आहे आणि तो आझाद गझलकारांनीही टिकवायला हवा बाकी वृत्तछंद वैगरे रंगरंगोटी आहे ती करायची काहीही गरज नाही 

इतरांनी का लिहिलं नाही ह्या प्रश्नाला अर्थच नाही हे म्हणजे तुकारामांनी मुक्तछंदात का लिहिलं नाही असं विचारण्यासारखं आहे आझाद गझल हा गझलेतला नवा विचार आहे जसा कधीकाळी गझलेत एका विषयाऐवजी अनेक विषय आणणे हा नवा विचार होता पण पुढे तो प्रस्थापित झाला आणि तुम्हाला तो मान्य झाला आहे आझाद गझल ही काही शतकांनी प्रस्थापित होईलच तेव्हा तुमच्यासारख्या लोकांनी आझाद गझलला गझल म्हणून मान्यता द्यायला विरोध केला ह्याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करतील आम्ही मात्र तुमच्या वृत्तछंदबद्ध गझलेला नेहमीच गझल म्हणून मान्यता दिलीये एकविषयी गझल , बहुविषयी गझल आणि आता आझाद गझल व पुढे चिन्हछंदी गझल असा हा गझलचा विकास आहे 

लय आणि शिस्त ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत लय तर प्रत्येक कवितेला आणि आझाद गझलेलाही आवश्यक आहे वृत्तछंद ही लय नाही तर शिस्त आहे म्हणून तर ती फेकून देता येते पण लय फेकून देणे अशक्य आहे अगदी मुक्तछंदातल्या कवितेलाही ती आवश्यक आहे 

अहो भटसाहेब मुक्त सॉनेट्सना  मुक्त सुनीतांना सॉनेट्स असंच म्हणतात हा तुम्हा लोकांचा हट्टीपणा आहे कि आम्ही गझल म्हणून मान्यता देणार नाही पण आम्ही मुक्त गझला ह्या गझला म्हणूनच लिहितो किंवा त्या आमच्याकडून लिहिल्या जातात जर तुम्ही म्हणता तशी शिस्त लयीचा आपसूक भाग म्हणून येत असेल तर येऊ देतो येऊ द्यावी नसेल येत तर कृत्रिमपणे आणू नये बंधन घातले तर मुक्त गझल मुक्त राहणारच नाही 






सर ही चळवळ मी जन्माला घातलेली नाहीये ती १९४० पासून अद्याप चालू आहे आणि मुक्तछंदाच्या चळवळीची ती भाग आहे गेली तीस बत्तीस वर्षे मी तीं मांडतोय तुम्ही मुक्तछंदात लिहाल तिला आम्ही कविता म्हणणारच नाही अशी सुरवात करणे आणि आझाद गझल लिहाल तर आम्ही त्याला गझल म्हणून मान्यता देणार नाही म्हणणे ह्या माझ्या मते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ह्यात सहभागी असलेल्या दोन संस्था आहेत आणि त्यातील एक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे लक्ष्यात घ्या एक विद्यापीठ तेहीअत्यंत प्रतिष्ठित असे  पुणे विद्यापीठ ह्यात शामिल आहे दुसरी संस्था माझी गझल ( पहा : ''आणि गझलबद्दलचे सारे गैरसमज दूर झाले'' -समक्ष समीक्षा जान फेब मार्च २०१७ लेखक प्रदीप निफाडकर जान फेब मार्च २०१७ पान ७८ ते ८२ व १०४)त्यामुळे ह्या पाहणीचे निष्कर्ष हे ठामपणे देण्यात आलेत आणि त्यात अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्तात लिहिल्या जातील त्याच गझल  असे जणू फर्मान काढण्यात आले आहे हा  फर्मानवजा निष्कर्ष आला नसता तर मीही ह्या भानगडीत आलोच नसतो माझ्या मुक्त गझला नाकारण्यात आल्या तेव्हा मला काहीच फरक पडला न्हवता पण हा प्रश्न आता एका व्यक्तीचा राहिलेला नाही मुक्त गझल लिहिण्याच्या साऱ्यांचीच मान्यता काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यात एक विद्यापीठ शामिल आहे हे कवी म्हणून मी कसे सहन करणार पाकिस्तानात ह्या अंगाने झालेली चर्चा मी समजू शकतो पण हा भारत आहे इथे हे कसे चालेल ?खरेतर पाकिस्तानातही आझाद गजल ची  चर्चा आझाद गजल  म्हणूनच होते मग इथे मुक्त गझल म्हणायला काय प्रॉब्लेम आहे ?बरं मी कधीही माझ्या मुक्त गझला थोर माना असे म्हंटलेले नाही शेवटी त्यातल्या बहुतांशी मी न्यू कॉलेजात स्टुडन्ट असताना लिहिल्या आहेत (१९८२ ते ८४) आणि त्यात काही गझलांत नवखेपणा आहे हे मलाही जाणवते पण प्रश्न माझ्या गझलांचा नाही इतरांच्या गझलांचा आहे आणि त्यांच्या बाजूने ह्या क्षणी कुणीतरी बोलायला हवे दुसरी गोष्ट भविष्यात दर्जेदार मुक्त गझला लिहिल्या जाणार नाहीत कश्यावरुन ?कधी कधी फक्त पेरून ठेवावे लागते असो धन्यवाद
श्रीधर तिळवे नाईक