Saturday, October 8, 2016

डेकॅथलॉन : रिअल प्रकाशित श्रीधर तिळवे नाईक 

जातिमुक्त /श्रीधर तिळवे 

अस्पृश्यांनी  पाण्यात ढकललं
ब्राह्मणांनी वेदात जाळलं
क्षत्रियांनी सत्तात गाडलं
वैश्यानी नोटात सपाट केलं
शुद्रानी नांगराला जुंपून
शेवटी कापून खाल्ल

आणि तरीही शेवटी शिल्लक राहिलो
तेव्हा गळ्यात दिलं
हे कवितेचं मडकं
आणि संतापाचा खराटा

त्यानं स्वतःचंच  आयुष्य झाडत झाडत
मी शेवटी जातिमुक्त झालो .

श्रीधर तिळवे
(
डेकॅथलोन  रिअल ह्या काव्यसंग्रहातून )

Wednesday, December 16, 2015

DECATHLON TRANSCEREAL

डेकॅथलॉन ट्रान्सरिअल 

प्रत्येक बुद्ध /श्रीधर तिळवे 
प्रत्येक बुद्ध प्रथम 
माझ्यासारखाच होता 

प्रत्येकजण माझ्यासारखा 
शेवटी बुद्धच होणार आहे 

मलाही बुद्धाप्रमाणे 
हे खोलवर कळायला हवे 

जेणेकरून 
मी जाणार नाही पळून 

बुद्ध होण्यापासून 

श्रीधर तिळवे -नाईक 
(डेकॅथ्लोन ट्रान्सरिअल (इन्फिनीट ) ह्या प्रकाशित काव्यसंग्रहातुन )

खरा मर्द /श्रीधर तिळवे 

आत्मचिंतेत जळण्यापेक्षा 
आत्मचितेत जळ 


स्वताची राख फासून जगशील 
तर खरा जगशील 

खरा मर्द 
आत मरतो 

चालणं  /श्रीधर तिळवे 
प्रथम नदीतून चालत गेला 
नदी उरली 

मग नदी चालत गेली 
पाणी उरलं 

मग पाणी चालत गेलं 
मी उरलो 

मग मी चालत गेलो 
चालणं  उरलं 

चालतोय 

श्रीधर तिळवे -नाईक 


(डेकॅथ्लोन ट्रान्सरिअल (इन्फिनीट ) ह्या प्रकाशित काव्यसंग्रहातुन )