Showing posts with label डेकॅथ्लोन ट्रान्सरिअल SPIRITUAL POEMS KOLHAPUR. Show all posts
Showing posts with label डेकॅथ्लोन ट्रान्सरिअल SPIRITUAL POEMS KOLHAPUR. Show all posts

Wednesday, December 16, 2015

DECATHLON TRANSCEREAL

डेकॅथलॉन ट्रान्सरिअल 

प्रत्येक बुद्ध /श्रीधर तिळवे 
प्रत्येक बुद्ध प्रथम 
माझ्यासारखाच होता 

प्रत्येकजण माझ्यासारखा 
शेवटी बुद्धच होणार आहे 

मलाही बुद्धाप्रमाणे 
हे खोलवर कळायला हवे 

जेणेकरून 
मी जाणार नाही पळून 

बुद्ध होण्यापासून 

श्रीधर तिळवे -नाईक 
(डेकॅथ्लोन ट्रान्सरिअल (इन्फिनीट ) ह्या प्रकाशित काव्यसंग्रहातुन )

खरा मर्द /श्रीधर तिळवे 

आत्मचिंतेत जळण्यापेक्षा 
आत्मचितेत जळ 

स्वताची राख फासून जगशील 
तर खरा जगशील 

खरा मर्द 
आत मरतो 

चालणं  /श्रीधर तिळवे 
प्रथम नदीतून चालत गेला 
नदी उरली 

मग नदी चालत गेली 
पाणी उरलं 

मग पाणी चालत गेलं 
मी उरलो 

मग मी चालत गेलो 
चालणं  उरलं 

चालतोय 

श्रीधर तिळवे -नाईक 

(डेकॅथ्लोन ट्रान्सरिअल (इन्फिनीट ) ह्या प्रकाशित काव्यसंग्रहातुन )