Tuesday, August 7, 2018

पुराणी कविताये


ईश्वर बोलायला सुरवात करतो
तेव्हा कॉन्स्पिरसिला सुरवात होते

कुठला शहाणा माणसाला कायदे देतो ?

कोणी ईश्वराच्या नावाने कायदे देतो
मग कॉन्स्पिरसीला सुरवात होते

ईश्वराला बोलता येत नाही
कारण बोलायला तोंड नावाची मर्यादा आवश्यक असते
पण मग कोणी ईश्वराच्या वतीने बोलायला लागतो
मग कॉन्स्पिरसीची सुरवात होते

ह्या जगात स्वतःच अन्याय करायचा असतो
पण अन्यायाविरुद्ध बंड होऊ नये म्हणून काळजीही घ्यायची असते
मग न्यायाचा मध निदान काल्पनिक तरी चाखता यावा म्हणून
ईश्वराच्या नावाने अंतिम न्याय आणला जातो
आणि कॉन्स्पिरसीची सुरवात होते

आणि मग एक दिवस ईश्वर मरतो
ईश्वराबरोबर कॉन्स्पिरसीही मरते
आणि मग ईश्वराची जाहिरात सुरु होते

आणि मग जाहिरात ते ते सारे करू लागते
जे कॉन्स्पिरसीने केले होते

जाहिरात सुरु आहे
आणि मी
जाहिरात मरण्याची वाट पाहतोय

श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )

शिवाजी महाराज कुठेच अस्तित्वात नाही 
पण शिवाजी पुतळ्याला शिवाजी महाराजांचा  पुतळा अस्तित्वात आहे 

शिवाजी महाराजांचा  घोडा कुठेच अस्तित्वात नाही 
पण शिवाजीच्या पुतळ्यात शिवाजी महाराज  त्यांच्या घोड्यावर  बसलेले  आहेत  

शिवाजी महाराज प्रत्यक्ष माझ्याशी बोलत नाहीत 
पण शिवाजी महाराजांची भूमिका करणारे नट शिवाजी महाराज म्हणून माझ्याशी बोलतायत 

अख्खी चिन्हसृष्टी माझ्या डोक्यात शिवाजी महाराज  बनून नाचतीये
आणि माझा अख्खा  जीव शिवाजी महाराज बनून गेलाय

मी मेलेलो नाही ना ?

श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
प्रबोधनात झोपी गेलेला मनुष्य
प्रबोधनात झोपी गेलेला मनुष्य 
स्वतःला आधुनिक समजतो 
आणि पेशवाईत झोपी गेलेल्या ब्राम्हणांची 
शिवाजीत झोपी गेलेल्या मराठ्यांची 
इज्जत काढतो 

त्याला वाटते तो फॉरवर्ड झालेला आहे
आणि पुरोगामित्वाचा झगा घालून हिंडण्याचा 
आणि इतरांना उपदेश देण्याचा अधिकार 
त्याच्या मेंदूला आहे 

त्याला त्याची झोप दिसत नाही 
कारण झोप सापेक्ष असते 
आणि जो जागा दिसतो 
तो कशात तरी झोपलेला असू शकतो 

तो स्वप्ने पाहतो 
फुले आंबेडकर आगरकर सावरकर टिळक गोखले होण्याची 
आणि स्वप्नात सर्वच खोटे असल्याने 
त्याला स्वप्नातच लघवी लागते 
आणि तो रिऍलीटीत मुतायला जागा होतो 

प्रबोधनात झोपी गेलेला मनुष्य 
घरी गणपती बसवतो 
गणेशउत्सवाला वर्गणी देतो 
आणि आपण टिळकांच्या मानसन्मानासाठी हे करतो 
असं स्वतःलाच पटवतो 

प्रबोधनात झोपी गेलेल्या मनुष्याला वाटते कि 
गणपतीपुढे नाचणारी पिढी 
अत्याधुनिक आहे 
आणि त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे 

प्रबोधनात झोपी गेलेला मनुष्य 
तरुणांचे प्रबोधन करण्यासाठी संधी शोधतो 
आणि ती सापडली कि त्याला 
आपण महान सामाजिक कार्य केल्याचे समाधान मिळते 

प्रबोधनात झोपी गेलेला मनुष्य 
त्याच्या फॅन्सना झोपेतल्या झोपेत सहीही देतो 
आणि आपली सही इंग्रजीत आहे ह्याची लाजही बाळगतो 

प्रबोधनात झोपी गेलेल्या मनुष्याला 
संपूर्ण भारताचे प्रबोधन झाले आहे असे दिवास्वप्न पडते 
आणि तो जागा होत नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
आपण मेलेलो आहोत 
आणि आपण जिवंत आहोत हे पटवायला 
आपण जगतो आहोत 

श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
एकमेकाला वापरून घेणे 
एव्हढा एकच अजेंडा असेल 
तर आपण प्रेमावर गप्पा का मारतोय ?

कमळांना जागा नाही आपल्या काळजात 
सीमारेषा एकमेकांचा बदाम खातात 
पण विलीन होत नाहीत 

आपली ऍनाटॉमी अंधार पितीये 
तलवारी शौर्य भाड्याने देतायत 

सूर्य आपणाला चमच्याएव्हढाच हवा आहे 
प्रकाशाचं ग्राईपवॉटर पिण्यासाठी 

समुद्राचं निळं लोखंड झालंय 
हळूहळू त्याला मानवी गंज चढेल 

निसर्गाची आपल्याला काहीही पडलेली नाही 
तो आपल्यासाठी फक्त एक पिकनिक स्पॉट आहे 

मी गोवेकर आहे हा कधीकाळी माझ्या अभिमानाचा विषय होता 
आता त्याची चौकशी फक्त फेणीसाठी होते 

तांदळावर काळाचा जेलीफिश चढतोय 
डोसा मागितला तर खेकडा ताटात पडेल असं भय वाटतंय 

अपउपयोगाची शारीरिक लक्षणे लोकांना तोंडपाठ आहेत 
पण जोवर ते उपयोगी आहेत 
तोवर लोकांचे त्यावर ऑब्जेक्शन नाहीये 

निंदेला शेजारी पुरेसे ठरतायत 
स्तुतीला चमचे 

मुंग्यांनी हत्ती खाऊन संपवला आहे 
हत्तीला मधुमेह झाल्याने तो अधिक गोड लागतो म्हणे 

बिझनेस डॉक्युमेंट्स जप बाबा 
समीक्षकांना कवी म्हणून मान्यता द्यायला 
आजकाल इन्कमची  डॉक्युमेंट्स लागतात 

आपुलकी कमर्शियल झाली आहे 
एकमेकांशी आपुलकीनं वागणारी कमर्शियल माणसं 

सॅटेलाईट्स आभाळाचा फिरता ताजमहाल बांधतायत 
तिथे मानवजातीची पुढील राजधानी तयार होणार आहे म्हणे 

आयुष्य स्वतःला भुताटकी पाहिल्यासारखं पाहतंय 

तुझा प्रेमाचा सुलट घडा इथे उपयोगाचा नाही 
पालथा कर 
पाणी टाकायला अख्खी मानवजात तयार आहे 

बघ 
तुझा मृत्यू फक्त डेथ सर्टिफिकेटवर विलसतोय 


श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
माझे नाव शंकराचे आहे
माझे आडनाव कन्नड आहे
माझे आईवडील गोव्यातून महाराष्ट्रात आले आहेत
पण मी कोल्हापुरात जन्मलो आहे
मी कोल्हापुरी आहे
माझी भाषा मराठी आहे

तुम्ही कन्नड म्हणून माझे दुकान जाळणार का ?
कि मी गोवन आहे म्हणून फेणी मागणार ?

स्वतःची मुळे रुजवण्याची ही धडपड नेमकी कशासाठी

जिथे पृथ्वीच आकाशात मूळांशिवाय लटकते आहे
तिथे वटवृक्ष बनण्याचा  हा माज कशासाठी ?

लोक इकडून तिकडे तिकडून इकडे
पोट घेऊन भटकत असतात
आणि त्यांच्या भुकेला इतिहास नसतो
मनुष्य झाड नाही
हे किती जंगलं जाळून तुम्हांला कळणार आहे ?

वसंतात सर्वांचेच केस  फुलांसारखे दिसतात
आणि शिशिरात सर्वांचे  हात बर्फासारखा होतात

भाषेची यमके फाटतांना
भाषा जिवंत ठेवण्याची जबाबदारी सर्वांच्यावर असते

माझ्या बापाने मराठी माध्यमात घालून
ती पार पाडली आहे

तुम्ही तुमची मुलं मराठी माध्यमात घातली आहे ?

ज्यांच्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या त्या माझ्या भाचरांना
मी स्वतःच्या जबाबदारीवर मराठी माध्यमात टाकले आहे
म्हणून हे विचारण्याचा अधिकार मला आहे

इंग्रजी भाषेचा ट्राफिक मराठीवर जसा कोसळतोय
तसा कन्नड आणि कोकणीवरही कोसळतोय

तुम्ही तो थांबवण्यासाठी काय केले

रस्त्यावर खड्डे पाडणे हा नको असलेल्या ट्रॅफिकवर उपाय नसतो
स्वतःच्या भाषेचा हायवे जागतिक करणे हा त्यावरचा उपचार असतो

शांतपणे जलदगतीने प्रवास करणे तुम्हाला साधते ?
कि फक्त तुम्ही मोठा आवाज करून प्रत्यक्षात स्लो मोशनमध्ये प्रवास करता ?

मृत्यू रात्री स्वतःला रिपीट करतो
मराठी भाषेची रात्र झाली आहे का ?

नेमाडेंच्या मिश्यांविषयी मला सांगू नका
त्या कॅचर इन द राय मध्ये वाढल्या आहेत

अल्लाउद्दीनचा दिवा मिळाला आणि म्हणाला
एकच इच्छा पुरी करतो
बोल मराठी टिकवू कि सत्ता देऊ
तर तुम्ही मराठी टिकवाल ?

तुमचा मरतानाचा शेवटचा शब्द काय असेल
गंगाजल कि वॉटर कि पाणी ?

श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
मी इतकं आणि असं काही लिहीन 
कि तुमचा माझ्यावरचा विश्वास उडेल 

मी इतकं परस्परविरोधी लिहीन 
कि तुम्ही महसूस कराल अनेक स्प्लिट्स आणि इरेग्युलर ऑर्डर्स 

मी जम्बो आणि सुईएव्हढं एका धारेत ओवीन 
आणि टीप म्हणून समुद्र टाकेन 

मी वैताग आणेन ढग गोळा करायला लावून 

मी आवंढा म्हणून गळा गिळायला लावेन 

मी धमक्या देईन मृत्यूच्या 
इतक्या कि 
तुम्ही म्हणाल 
झक मारला कवितेचा टेलिफोन घेतला 

मी ओशाळायला लावेन माझ्याविषयीच्या तुमच्या अपेक्षा मोडीत काढून 

मी खटकाच्या सुरीखाली तुमची  मान ठेऊन 
तिला तावून सुलाखून काढेन 

तरी यदाकदाचित जवळ आलात तर शेंगदाणे देईन 
पीनट्स च्या भावाने


श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )

श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
श्रीधर तिळवे नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )

No comments:

Post a Comment